Water Conservation  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Conservation : शेतकऱ्यांसाठी जलसंधारण योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार

Minister Sanjay Rathod : शासनाच्या खांद्याला खांदा लावून अनेक स्वयंसेवी संस्था जलसांधरणाची कामे करीत आहेत. शांतिलाल मुथा यांच्या नेतृत्त्वात बीजेसने या उपयुक्त पोर्टलची निर्मिती करून जलसंधारण विभागास सुपूर्द केले.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : ‘जलस्रोतांची मर्यादा, पाणी टंचाई यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पाणी असेल तरच शेतीची उन्नती होते. म्हणून पाणी आडवणे-साठवणे, तलावांचे पुनरुज्जीवन करणे काळाची गरज बनली.

त्यासाठी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ तसेच ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या योजना सर्व गावात प्रभावीपणे कायमस्वरूपी राबविण्याच्या निर्णय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात शासनाने घेतला आहे,’ असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री श्री. संजय राठोड यांनी केले.

या योजेनांच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘गाळमुक्त धरण' अर्थात www.shiwaar.com पोर्टलचे उद्‌घाटन संजय राठोड यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने शुक्रवारी (ता. २१) झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते.

या वेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथा, राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला, एमडी कोमल जैन, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मृद व जलसंधारण अधिकारी तसेच सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

मंत्री श्री. राठोड म्हणाले, ‘‘शासनाच्या खांद्याला खांदा लावून अनेक स्वयंसेवी संस्था जलसांधरणाची कामे करीत आहेत. शांतिलाल मुथा यांच्या नेतृत्त्वात बीजेसने या उपयुक्त पोर्टलची निर्मिती करून जलसंधारण विभागास सुपूर्द केले. या योजनेचा उद्देश, पात्रता, निकष, प्रशिक्षण अशी संपूर्ण माहिती एका क्लिकवर पोर्टलच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध झाली आहे. याचे उद्‌घाटन करताना मला अतिशय आनंद झाला.’’

‘‘राज्यातील सर्व सरपंचांनी, शेतकऱ्यांनी, गावकऱ्यांनी या महत्त्वपूर्ण पोर्टलचा लाभ घेऊन आपल्या गावात या योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांचे मोठे सहकार्य लागणार आहे. निधीची कुठेही कमतरता पडणार असून थेट जिल्हाधिकाऱ्यांकडेच तो वर्ग करण्यात येईल,’’ असे मंत्री राठोड यांनी सांगितले.

गणेश पाटील यांनी या योजनेची भूमिका, महत्त्व स्पष्ट केले. शांतिलाल मुथा यांनी या पोर्टलची निर्मिती, उपयुक्तता, शेतकरी-सरपंचांसाठी असलेले महत्व थेट प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले. तर नंदकिशोर साखला यांनी उपस्थितांचे आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT