Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season : खते, बियाणे विक्रेत्यांवर १४ भरारी पथकांचा ‘वॉच’

Fertilizer : खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरण्यांसाठी आतापर्यंत सुमारे अडीच लाख मेट्रिक टन रासायनिक खते आणि २५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

Team Agrowon

Pune News : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरण्यांसाठी आवश्‍यक रासायनिक खते आणि बी-बियाणे उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने सर्व खते व बियाणे विक्रेत्यांकडे पुरेशा साठा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. परंतु काही विक्रेते हे खते व बियाणांची जास्त दराने विक्री करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक कृत्रीम टंचाई निर्माण झाल्याचा भास निर्माण करतात.

अशा खते व बियाणे विक्रेत्यांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने १४ भरारी पथके स्थापन करण्यात आले आहेत. या भरारी पथकांच्या माध्यमातून खते व बियाणे विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

जाणीवपूर्वक खते व बियाणांची टंचाई निर्माण झाल्याचा भास करून निश्‍चित केलेल्या किमतीपेक्षा जास्त भावाने शेतकऱ्यांना खते व बियाणांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरण्यांसाठी आतापर्यंत सुमारे अडीच लाख मेट्रिक टन रासायनिक खते आणि २५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यापैकी प्रत्यक्षात आजअखेरपर्यंत ८० टक्के साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खते व बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.

पुणे जिल्ह्यातील तेरापैकी हवेली, मावळ, मुळशी, भोर, वेल्हे, खेड, जुन्नर आणि आंबेगाव हे आठ तालुके खरीप तालुके म्हणून ओळखले जातात. या तालुक्यांमधील मिळून जिल्ह्यातील एक हजार ३८० गावे हे खरीप गावे आहेत. जिल्ह्याचे खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र (उसासह) तीन लाख ६२ हजार हेक्टर एवढे आहे. यापैकी खरीप पिकांसाठी एक लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT