Gram Panchayat Fund  Agrowon
ॲग्रो विशेष

Gram Panchayat Fund : निधी खर्च न करणाऱ्या ग्रामपंचायतींना तंबी

Rural Development : पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यात पिच्छाडीवर असलेल्या ग्रामपंचायतींबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Team Agrowon

Nashik News : पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यात पिच्छाडीवर असलेल्या ग्रामपंचायतींबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायतींना प्राप्त निधीचे चार स्तरांवर नियोजन करण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेतील (कै.) रावसाहेब थोरात सभागृहात मंगळवारी (ता. १०) पंधराव्या वित्त आयोग निधी खर्चाचा आढावा घेतला. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुधाकर मोरे, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील उपस्थित होते.

ग्रामपंचायतींना निधी प्राप्त झाल्यापासून किती कामांना मान्यता दिली, मान्यतेच्या प्रक्रियेत किती कामे आहेत, प्रत्यक्षात किती कामे सुरू झाली, किती निधी शिल्लक आहे अशा पद्धतीने चार स्तरांवर नियोजन करण्याची सूचना दिली.

पंधरा दिवसांत यादी

निधी अखर्चित असल्याची नेमकी कारणे, प्रशासकीय मान्यता व प्रलंबित कार्यारंभ आदेश, कार्यारंभ आदेशानंतर कामांची सद्यःस्थिती, कार्यारंभ आदेश देऊनही कामे सुरू न होण्याची कारणे, कामे पूर्ण होऊनही निधी वितरणास विलंब का याबाबत, गावनिहाय यादी १५ दिवसांत जाहीर करण्याचे आदेश आशिमा मित्तल यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

Paddy Nursery Update: भाताच्या ५८६१ हेक्टरवर रोपवाटिका

Free Seed Distribution: दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

SCROLL FOR NEXT