Cashew Rate
Cashew Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew rate in Sindhudurg: सिंधुदुर्गात काजू बी खरेदीदारांविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यातील काजू खरेदीदारांनी काजू बीचे दर (Cashew Seed Rate) उत्पादन खर्चापेक्षा कमी केले आहेत. त्यामुळे काजू बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे.

काजू खरेदीदार मनमानीपणाने दर कमी करीत असल्याचा आरोप करून काजू बागायतदारांनी खरेदीदारांच्या धोरणाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यात काजू बीचे दर प्रतिकिलो १३० रुपये होते. गेल्या दोन आठवड्यात हा दर प्रतिकिलो ११० रुपयांवर आला आहे. काजू बागातयदाराला प्रतिकिलो १२२ रुपये उत्पादन खर्च येतो.

याचा कोणताही विचार व्यापारी, कारखानदारांकडून न करता सध्या काजू बी ११० रुपयांनी खरेदी केली जात आहे. व्यापारी आणि कारखानदार मनमानीपणे काजूचे दर ठरवीत असून या धोरणाविरोधात काजू बागायतदारांनी आता आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

वैभववाडी तालुक्यातील काजू उत्पादक शेतकरी विलास देसाई, प्रदीप जैतापकर, उदय जैतापकर, महेश रावराणे, उज्ज्वल नारकर यांच्यासह विविध शेतकऱ्यांनी तहसीलदार प्रसन्नजित चव्हाण यांची भेट घेतली. त्यांनी काजू उत्पादकांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडत त्यांना निवेदन दिले.

वातावरणातील बदल आणि त्यामुळे कीडरोगांचा वाढलेला प्रादुर्भाव, मजुरीचे वाढलेले दर, खतांच्या वाढलेल्या किमती, जंगली प्राण्यांकडून होणारे नुकसान यामुळे सद्यःस्थितीत काजू उत्पादन शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे चित्र आहे.

तरीदेखील अनेक शेतकरी काजूचे उत्पादन घेत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांत काजू बीचे दर सातत्याने घसरत आहेत. व्यापारी मनमानीपणाने काजूचे दर कमी करताना दिसत आहेत.

त्यामुळे शासनाने काजूला हमीभाव द्यावा किंवा गोवा सरकारप्रमाणे सपोर्ट प्राइज द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, कुणीही काजू उत्पादकांनी कोणत्याही परिस्थितीत प्रतिकिलो १५० रुपये दरापेक्षा कमी दराने काजू बी विक्री करू नये. याशिवाय वैभववाडी आठवडाबाजारात होणारी काजू खरेदी देखील थांबविण्याचा निर्णय काजू उत्पादकांनी घेतला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Fertilizer : जळगावात मुबलक खतांसाठी कृषी विभागाची दमछाक

Mahabeej Workshop : कानशिवणी येथे ‘महाबीज’ची शेती कार्यशाळा

Maharashtra Rain : विदर्भात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज

Drought 2024 : देशातील प्रमुख धरणात पाणीसाठा घटला; पाणीसंकट गंभीर ?

Sludge Remove Campaign : ‘घरणी’तील गाळ उपसा मोहिमेची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT