Banana Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Market Rate: जळगावात केळीची कमी दरात खरेदीप्रकरणी कारवाईचा इशारा

जळगाव जिल्ह्यासह लगत केळीची गेले काही दिवस कमी दरात किंवा बाजार समितीने जाहीर केलेल्या दरांपेक्षा कमी दरात खरेदी केल्याचे प्रकार सुरू होते.

Team Agrowon

Jalgaon Market News : जळगाव जिल्ह्यासह लगत केळीची गेले काही दिवस कमी दरात (Banana Rate) किंवा बाजार समितीने जाहीर केलेल्या दरांपेक्षा कमी दरात खरेदी केल्याचे प्रकार सुरू होते.

याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची प्रशासनाने दखल घेतली असून, कमी दरातील खरेदीसंबंधी चौकशी व आलेल्या तक्रारींवर तातडीने संबंधितांविरूद्ध कारवाईच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

जिल्ह्यात अनेक शेतकरी निर्यातक्षम केळीचे उत्पादन करतात. ज्या केळीची निर्यात परदेशीत व इतर भागात होत आहे, त्या शेतकऱ्यांना दर बऱ्यापैकी मिळत आहेत. परंतु कमी दर्जाची केळी व इतर केळी उत्पादकांना रावेर बाजार समिती जे दर जाहीर करते, त्यापेक्षा कमी दर मिळत आहेत.

याबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. रावेरातही कोचूर व लगत असे कमी दरात केळी खरेदीचे प्रकार सुरू आहेत. तसेच ऐनपूर, निंबोल, केऱ्हाळे भागातही शेतकऱ्यांमध्ये तक्रारी आहेत.

रावेर बाजार समिती केळीचे दर रोज जाहीर करते. परंतु या दरात केळीची खरेदी होत आहे की नाही याबाबत तपासणी, चौकशी कुठेही केली जात नाही. मध्यंतरी चोपडा, जळगाव बाजार समितीदेखील केळी दर जाहीर करीत होती. परंतु कमी दरात खरेदीचे प्रकार सुरूच होते.

या प्रकाराकडे बाजार समित्या व जिल्हा उपनिबंधक विभाग, संबंधित यंत्रणा सतत दुर्लक्ष करीत आहेत. तसेच अनेक व्यापारी विनापरवाना खरेदी करतात. उधारीने खऱेदीचे प्रकार होवून पुढे शेतकऱ्यांची फसवणूकदेखील होते.

या प्रकाराला वाचा फोडताच जिल्हा प्रशासनाने संबंधित बाजार समित्यांना कमी दरातील खरेदीचे प्रकार कुठे झाले, याची माहिती देण्यास सांगितले आहेत. तसेच याबाबत तक्रारी असतील तर त्याचे तातडीने निराकरण करावे, अशा सूचना केल्या आहेत.

यातच याबाबत चौकशीसाठी पथके नेमून थेट शेतांमध्ये तपासणी, शेतकऱ्यांची केळी काढणीदरम्यान भेट घेण्याची आवश्यकता असल्याचे मत शेतकरी उपस्थित करीत आहेत. केळीची खरेदी थेट शिवारात किंवा शेतात केली जाते.

यामुळे बाजार समितीत बसूनबसून काहीही उपयोग नाही. बाजार समित्या, सहायक निबंधक कार्यालयासह वजन व मापे विभागाने पथक तयार करून ज्या भागात अधिकची केळी काढणी सुरू आहे, त्या भागात चौकशीसत्र राबविण्याची मागणीदेखील होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT