Cyclone Biporjoy  Agrowon
ॲग्रो विशेष

Cyclone Biporjoy : बिपॉरजॉय चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गात दक्षतेचा इशारा

Weather Update : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे बिपरजॉय चक्रीवादळात रूपांतर झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सिंधुदुर्गात दक्षतेचा इशारा दिला आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे बिपरजॉय चक्रीवादळात रूपांतर झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सिंधुदुर्गात दक्षतेचा इशारा दिला आहे. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन केले आहे.

दरम्यान बुधवार (ता. ७) सायकांळपासूनच समुद्राच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाल्यामुळे मालवण येथील मच्छीमारांची चांगलीच ताराबंळ उडाली.

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे बुधवारी बिपरजॉय चक्रीवादळात रूपांतर झाल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. या चक्रीवादळाचा प्रभाव बुधवार दुपारपासूनच जाणवण्यास सुरुवात झाली. दुपारी दीडच्या सुमारास समुद्राच्या पाणीपातळीच अचानक वाढ झाली. त्यामुळे मच्छीमारांची चागंलीच दमछाक झाली.

मासेमारी नौका, जाळ्या सुरक्षित स्थळी हलविताना मच्छीमारांची धावपळ झाली. काही मच्छीमारांची जाळी वाहूनदेखील गेली. दरम्यान गुरुवार ते शनिवार (ता. १०) या कालावधीत चक्रीवादळ अधिक त्रीव होणार आहे.

या कालावधीत अरबी समुद्रात ताशी १०५ ते १५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे तर किनारपट्टीला ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. याशिवाय पाऊसदेखील पडण्याची शक्यता आहे.

समुद्राला उधाणाची स्थिती येणार असून लाटांची उंची अधिक असणार आहे. त्यामुळे या कालाधीत मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीकरिता जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार झाले असून याचा प्रभाव शनिवारपर्यंत (ता. १०) जाणवणार आहे. या कालावधीत समुद्राच्या लाटांच्या उंचीत वाढ होणार आहे. याशिवाय वाऱ्याचा वेगदेखील वाढणार आहे. त्यामुळे मच्छीमारांनी मासेमारीकरिता समुद्रात जाऊ नये. पर्यटक, नागरिकानी समुद्रकिनारी जाणे टाळावे.
मच्छींद्र सुकटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरण, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT