Pune APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Wardha APMC : वर्धा बाजार समितीने मांडला नफ्याचा ताळेबंद

APMC Audit : जिल्ह्यात जिनिंग, सूतगिरण्या बंद पडल्याने बाजारातील कापसाची आवक कमी झाली. त्यातच बाजार समिती कार्यक्षेत्रातील काही जिनींग व्यावसायिकांनी थेट परवाने घेतले या सर्वांचा बाजार सेसवर परिणाम झाला.

Team Agrowon

Wardha News : शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी पूरक सुविधांची उपलब्धता करीत व्यवहारासाठी सकारात्मक वातावरण निर्माण केल्यानंतर गेल्या पंधरा वर्षांत पहिल्यांदाच वर्धा बाजार समितीने नफ्याचा ताळेबंद मांडला आहे.

जिल्ह्यात जिनिंग, सूतगिरण्या बंद पडल्याने बाजारातील कापसाची आवक कमी झाली. त्यातच बाजार समिती कार्यक्षेत्रातील काही जिनींग व्यावसायिकांनी थेट परवाने घेतले या सर्वांचा बाजार सेसवर परिणाम झाला. बाजार समितीचे सभापती अमित गावंडे, उपसभापती पांडुरंग देशमुख व संचालक मंडळाने ही बाब गांभीर्याने घेत व्यापाऱ्यांशी संवादावर भर दिला.

थेट परवान्याऐवजी बाजार परवाने देण्यात आले. त्यातून अवघी १५ हजार क्‍विंटल असलेली कापसाची आवक वाढत अडीच लाख क्‍विंटलवर पोहोचली. यामध्ये बाजारात थेट येणाऱ्या दीड लाख क्‍विंटल कापसाचा समावेश आहे.

एकाच दिवशी धान्य आवक विक्रमी सहा हजार क्‍विंटलवर पोहोचली. त्यातूनच बाजार समितीचे उत्पन्न गेल्या आर्थिक वर्षात ३ कोटी ४५ लाख ३८ हजार १६३ रुपयांवर पोहोचले. यातून खर्च वजा जाता नफा १ कोटी २० लाख ९ हजारांचा झाला. दोन कोटी दीर्घ मुदतीत ठेवण्यात आले आहेत.

...अशा आहेत सुविधा

स्वच्छ पाणी, शिवभोजनच्या माध्यमातून पाच रुपयांत जेवण, नव्या शेडची उभारणी व जुन्या शेडची दुरुस्ती त्यासोबतच सेसमध्ये वाढ व्हावी याकरिता जिनिंग परिसरात कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली. या उपक्रमातून धान्य व कापसाची आवक वाढली, असे अमित गावंडे यांनी सांगितले.

उत्पन्न वाढल्याने बाजार समितीने शेतकरी हिताच्या उपक्रमांवर भर दिला आहे. त्यातून अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी रणजितदादा कांबळे शेतकरी कल्याण सन्मान योजना सुरू करण्यात आली. अल्पभूधारक शेतकऱ्यांना अडचणीत यातून दहा हजार रुपये देण्यात येतील.
- अमित गावंडे, सभापती, बाजार समिती, वर्धा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra FPO Growth: शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या विकासात महाराष्ट्र अव्वल, मध्य प्रदेश दुसऱ्या स्थानावर

Dam Water Storage: देशातील धरणांमध्ये ८६ टक्के पाणीसाठा; सप्टेंबरमध्येही चांगल्या पावसाचा अंदाज

Flower Business: डेझी, गोल्डन रॉडसह अन्य फुलांनी खालला भाव

Silai Machine Scheme: महिलांना शिलाई मशिनसाठी सरकार देतयं ९० टक्के अनुदान; भरावी लागणार फक्त १० टक्के रक्कम

Maratha Protest: पुन्हा नाकेबंदी न परवडणारी

SCROLL FOR NEXT