Agricultural Pumps Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Pumps : वीस अश्‍वशक्तीच्या कृषिपंपांचे बिल माफ करा

Farmers Demand : आगामी काळामध्ये निवडणुकीपूर्वी २० अश्‍वशक्तीपर्यंत विद्युत पंपांना वीज बिल माफी करावी, अशी मागणी पारगाव ग्रामस्थांनी केली आहे.

Team Agrowon

Pune News : राज्य शासनाने साडेसात अश्‍वशक्तीपर्यंत विद्युत पंपांना वीजबिल माफी केली आहे. मात्र आगामी काळामध्ये निवडणुकीपूर्वी २० अश्‍वशक्तीपर्यंत विद्युत पंपांना वीज बिल माफी करावी, अशी मागणी पारगाव ग्रामस्थांनी केली आहे.

वीजबिल माफी संदर्भात पारगाव येथील रामकृष्ण पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष पोपटराव ताकवणे म्हणाले की, साडेसात अश्‍वशक्ती विद्युत पंप असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ४४ लाख आहे. साडेसातपेक्षा जास्त अश्‍वशक्ती असणाऱ्या विद्युत पंपांची संख्या राज्यात अवघी ३ लाख आहे.

साडेसातपेक्षा जास्त अश्‍वशक्ती असणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनाही वीज बिल मागणीचा लाभ मिळणे आवश्यक आहे. ग्रामीण भागामध्ये अनेकदा कमी क्षेत्र असल्यामुळे पाच ते दहा शेतकऱ्यांचा एकत्रित मिळून गट तयार केला जातो.

सर्वांमध्ये मिळून एकत्रित १५ ते २० अश्‍वशक्तीचा विद्युत पंप टाकून वैयक्तिक पाणीपुरवठा योजना सुरू केली जाते. वैयक्तिक विचार करता प्रत्येक शतकऱ्यांच्या वाट्याला ४ ते ५ अश्‍वशक्ती विद्युत पंपाचे पाणी आलेले असते.

परंतु खर्च वाचण्यासाठी व इतर त्रास टाळण्यासाठी शेतकरी एकत्रितपणे २० अश्‍वशक्तीच्या विद्युत पंप शेतीसाठी बसवतात. सरपंच सुभाष बोत्रे म्हणाले, की याशिवाय जमिनीचा हेड जास्त असल्याने किंवा नदीपासून शेतीचे अंतर जास्त असल्यास शेतकरी जास्त पाणी मिळावे म्हणून जास्त अश्‍वशक्तीचा विद्युत पंप आपल्या शेतीसाठी टाकतो.

त्यामुळे या वीज बिल माफीचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. याशिवाय शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात यावी. सलग बारा तास वीज मिळावी. कारण रात्री साप, विंचू, बिबट्या, रानडुकरे यांचा धोका नदीकाठच्या शेतकऱ्यांना असतो, असेही म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT