Drought Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : खानदेशात पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा

Rain Update : खानदेशात मागील दोन-तीन दिवसांपासून अपवाद वगळता पाऊस झालेला नाही.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मागील दोन-तीन दिवसांपासून अपवाद वगळता पाऊस झालेला नाही. सोयाबीन, कापूस, ज्वारी, मका व अन्य पिकांची पेरणी रखडली आहे. पेरणीयोग्य पावसाची शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. खानदेशात सुमारे १८ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

या महिन्यात किमान ५० टक्के पेरण्या पूर्ण होतील, अशी अपेक्षा होती. परंतु पेरण्या रखडल्या आहेत. बियाणे बाजारही संथ झाला आहे. मागील बुधवारी (ता. १९) गुरुवारी (ता. २०) व शुक्रवारी (ता. २१) खानदेशात अपवाद वगळता पाऊस झालेला नाही. ऊन तापत आहे.

उष्णता वाढली असून, पिकांचे सिंचन करावे लागत आहे. सोमवारी (ता. १७) अनेक भागांत दुपारी व सायंकाळी अनेक भागांत पाऊस झाला होता. पण पावसात सातत्य नाही. पेरणीयोग्य पाऊस नसल्याने अपवाद वगळता पेरणीला कुठेही वेग आलेला नाही. पेरणीसाठी किमान ६० ते ६५ मिलिमीटर पावसाची गरज आहे, असेही कृषी यंत्रणांनी म्हटले आहे.

पावसाळी वातावरण गेले काही दिवस आहे, मध्येच ऊन पडते. दुपारी उकाडा असतो. पण पेरणीयोग्य किंवा ४० ते ६५ मिलिमीटर पाऊस कुठेही झालेला नाही. सोमवारी जळगाव, धरणगाव, एरंडोल आदी तालुक्यांतील काही काही भागांत पाऊस झाला होता. १८ ते नऊ मिलिमीटर पाऊस या भागात झाला. पण यात जमिनीत हवा तसा वाफसा नाही, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

कोरडवाहू कापूस लागवड सर्वत्र सुरू झालेली नाही. कारण चांगला पाऊस अपेक्षित आहे. धूळपेरणीदेखील अनेकांनी पावसाच्या अनियमिततेमुळे टाळली आहे. कापूस, तूर, उडीद-मूग, सोयाबीनचे बियाणे महाग आहे. यामुळे पेरणीबाबत शेतकरीदेखील चांगल्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.

सोमवारी जळगाव जिल्ह्यात जळगाव, धरणगाव, एरंडोल, धुळ्यातील धुळे, नंदुरबारातील शहादा, अक्कलकुवा आदी भागांत हलका ते मध्यम पाऊस झाला, पण कुठेही २५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला नाही. धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा व धुळे भागांतही हलका पाऊस झाला. नंदुरबारात काही भागांत अल्प किंवा हलका पाऊस झाला.

जळगाव तालुक्यात पिंप्राळा मंडलात १८ मिलिमीटर पाऊस झाला. यात काही गावांत अगदी तुरळक पाऊस आहे. अशीच स्थिती इतर भागातही आहे. पेरण्या वेळेत होतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. तूर, उडीद, मूग, ज्वारी, सोयाबीनची पेरणी २० जूनपूर्वी होईल, असे संकेत सुरुवातीला होतो. परंतु पेरणी झालेली नाही. हवामानासंबंधीच्या अंदाजानुसार पेरणी पुढील आठवड्यात पाऊस आल्यानंतर गती घेईल, असे संकेत मिळत आहेत.

सातपुडा भागातही पाऊस नाही

पावसाबाबत समाधानकारक स्थिती धुळे व नंदुरबारातही नाही. मोसमी पावसाचे आगमन झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकरी पेरणीचे नियोजन करीत आहे. हमीभावदेखील जाहीर झाल्याने पेरणीचे अचूक नियोजन शेतकरी पुढे करतील. सातपुडा पर्वातही पावसाने हजेरी लावलेली नाही. ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. सकाळी ढग जमा होतात, दुपारी उन्हाचे चटके बसतात, अशी स्थिती आहे. यामुळे सातपुड्यातील शेती क्षेत्रातही कोरडवाहू पिकांची पेरणी झालेली नसल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT