Agriculture Electricity Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

Agriculture Pump Electricity : राज्य शासनाने कृषी पंपधारकांचे साडेसात एचपीच्या आतील वीजबिल माफ केले आहे. जिल्ह्यात एक लाख १४ हजार ८०२ पंपधारकांना याचा लाभ मिळेल.

Team Agrowon

Kolhapur News : जिल्ह्यातील ८०९ पाणीपुरवठा संस्थांमध्ये ५ लाख शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना पाणीपुरवठा संस्थेअंतर्गत येणारे वीजबिल माफ करावे, अशी मागणी होत आहे. साडेसात एचपीच्या आतील कृषिपंपांची वीजबिल माफी केल्यानंतर पाणीपुरवठा संस्थांमधील शेतकऱ्यांच्या वीज बिलमाफीचा प्रश्न निर्माण झाला असून याबाबत निर्णय होणार काय, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

राज्य शासनाने कृषी पंपधारकांचे साडेसात एचपीच्या आतील वीजबिल माफ केले आहे. जिल्ह्यात एक लाख १४ हजार ८०२ पंपधारकांना याचा लाभ मिळेल. एप्रिलपासून वीजबिल माफ केले आहे. साडेसात एचपीच्या वर ३३ हजार १३५ पंपधारक आहेत.

नदीपासून लांब अंतरावर शेती असल्यामुळे जादा एचपी पंप बसवावे लागतात. अनेक शेतकऱ्यांनी पंप परवाने १० ते २० एचपीपर्यंत घेतले आहेत. मात्र प्रत्यक्ष साडेसात एचपी किंवा त्याच्या आतीलच पंप बसवले आहेत. साडेसात एचपीच्या आतील पंपधारकांची वीजबिल माफी केली असली तरी पाणीपुरवठा संस्थांच्या मध्ये शेतकरी अर्धा एचपी ते एक एचपीपर्यंतचा वापर होत आहे.

यामुळे छोटे छोटे एचपीधारक शेतकरी वीजबिलमाफीला पात्र आहेत. शेतकऱ्यांना वीजबिल माफी मिळावी, अशी मागणी होत आहे. जिल्ह्यात ८०९ पाणीपुरवठा संस्था आहेत. संस्थांमध्ये दोनशे ते १२०० सभासद असतात.

या संस्थांच्या माध्यमातून पाच लाख शेतकरी सभासद आहेत. या संस्थांचा वीज वापर मोठ्या प्रमाणावर असला तरी प्रतिशेतकरी अर्धा ते एक एचपीपर्यंतच विभागून येतो. यामुळे संस्थांमधील शेतकऱ्यांना वीजबिल माफीचा लाभ मिळावा, अशी मागणी आहे.

साडेसात एचपीच्या वरील पंपधारकांचे नदीपासून लांब अंतरावर शेत आहे. यामुळे त्यांनी जादा हॉर्स पॉवर घेतले आहे. पाणीपुरवठा संस्थांमधील शेतकऱ्यांच्या वाट्याला अर्ध्या ते एक एचपी वीज वापर येतो. यामुळे पाणीपुरवठा संस्थांमधील शेतकरी वीजबिल माफीस पात्र आहेत. त्यांना माफी मिळावी. राज्यात १४ हजार ७०० कोटी अनुदान मंजूर केले. यामध्ये अडीच हजार कोटी वाढ करून सतरा हजार कोटी अनुदान दिल्यास सर्व पंपधारकांना लाभ मिळेल.
- विक्रांत पाटील, अध्यक्ष, जिल्हा इरिगेशन फेडरेशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Advisory: पिकांमधील अन्नद्रव्ये कमतरता, कीड-रोग निदानासाठी प्रक्षेत्र भेट

Rural Healthcare Development: आरोग्य सेवेला बळकटी

Supreme Court: निवडणूक आयुक्तांना कायदेशीर संरक्षण देणाऱ्या कायद्याची सुप्रीम कोर्टाकडून पडताळणी; केंद्र सरकारला नोटीस

Vegetable Cultivation: नगदी वाल पिकामुळे बळीराजाला आधार

UMED Mission: उमेद अभियानात काम करणाऱ्या महिलांना आता नवी ओळख, 'ग्रामसखी' या नावाने ओळखले जाणार

SCROLL FOR NEXT