Amravati Crime Agrowon
ॲग्रो विशेष

Amravati Crime : अमरावतीमध्ये मृत व्यक्तीच्या नावे काढली मजुरी

Amravati Fraud : अमरावती तेलखार ग्रामपंचायतीमधील मृत व्यक्ती तसेच ज्यांनी कधीच या योजनेत काम केलेले नाही, अशा लोकांच्या नावे रोजगार हमी योजनेची मजुरी काढली गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

Team Agrowon

Amravati Rojgar Hami Yojana : अमरावती तेलखार ग्रामपंचायतीमधील मृत व्यक्ती तसेच ज्यांनी कधीच या योजनेत काम केलेले नाही, अशा लोकांच्या नावे रोजगार हमी योजनेची मजुरी काढली गेल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत कार्यालय तेलखारमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामावर शेकडो मजूर काम करतात. पण बाबूलाल बाटू सावलकर यांचा मृत्यू २०१८ मध्ये झाला असताना रोजगार सेवक व तांत्रिक अधिकारी यांनी मृत सावलकर यांना २०२४ मध्ये रोजगार हमी योजनेच्या कामावर तब्बल १८ दिवस दाखविले आहेत. त्याची नोंद ऑनलाइन हजेरीपटावर दाखवीत असून बँकेतून खोट्या सह्या करून पैसे काढण्यात आले आहेत. तसेच रोजगार हमी योजनेच्या कामावर गावातील विद्यार्थी, नोकरी पेशातील लोकांची नावे दाखविल्या गेली आहेत.

जे लोकं गावात राहत नाहीत, अशांची नावे पण रोजगार हमी योजनेच्या कामावर दाखविल्या गेली असून रोजगार सेवकांच्या घरातील मंडळींना कामावर न जाता त्यांच्या नावाने मजुरी काढल्याचा प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकरणाची चौकशी गावातील ग्रामसभेमध्ये सुद्धा मांडण्यात आली होती.

पण रोजगार सेवकाने गावातीलच काही लोकांना हाताशी धरून गोंधळ घातल्याचा आरोप तेलखार गावातील नागरिक अमर ठाकरे, तुळशीराम दिवाकर व भास्करराव ठाकरे यांनी गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे यांच्याकडे केली आहे. आता या गंभीर बाबीवर गटविकास अधिकारी काय कार्यवाही करतात, याकडे संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

तेलखार गावातील रोजगार सेवक व तांत्रिक अधिकारी यांच्या संगनमताने गावातील मृत व्यक्तीच्या नावावर पैसा हडपण्याचा प्रकार घडला आहे. या गंभीर बाबीची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मी गटविकास अधिकारी यांना केली आहे.

- अमर ठाकरे, तेलखार

रोजगार सेवक व तांत्रिक अधिकारी यांच्या विरोधात तक्रार प्राप्त झाली असून त्याबाबत येणाऱ्या १५ मे रोजी चिखलदऱ्याच्या पंचायत समिती कार्यालयात सुनावणी ठेवली आहे. चौकशीअंती कार्यवाही करण्यात येईल.

- शिवशंकर भारसाकळे,

गटविकास अधिकारी, चिखलदरा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT