Gram Panchayat Election Agrowon
ॲग्रो विशेष

Gram Panchayat Election : सांगलीत ९४ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान

Local Body Election : डिसेंबर व जानेवारीत मुदत संपलेल्या आणि २०२२ मध्ये चुकीच्या प्रभागरचनेमुळे निवडणूक न झालेल्या ग्रामपंचायतींत धुरळा उडणार आहे.

Team Agrowon

Latest Marathi News : सांगली जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी (ता. ४) जाहीर झाला. डिसेंबर व जानेवारीत मुदत संपलेल्या आणि २०२२ मध्ये चुकीच्या प्रभागरचनेमुळे निवडणूक न झालेल्या ग्रामपंचायतींत धुरळा उडणार आहे.

५ नोव्हेंबर रोजी मतदान आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील ८९ ग्रामपंचायतींच्या आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले. या ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारपासून (ता. ३) आचारसंहिता लागू झाली.

तहसीलदार ६ ऑक्टोबरला नोटीस प्रसिद्ध करतील. अर्ज मागवण्यास १६ ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. २० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्यास मुदत असेल. अर्ज मागे घेण्याची मुदत २५ ऑक्टोबर असेल. त्याच दिवशी चिन्हांचे वाटप होईल. ५ नोव्हेंबरला मतदान, ६ ला मतमोजणी होईल.

सांगली जिल्ह्यात मंगळवारपासून आचारसंहिता लागू झाली असल्याचे जिल्हा निवडणूक विभागातर्फे सांगण्यात आले. गत निवडणुकीप्रमाणे यंदाही थेट सरपंचपदासाठी निवडणूक चुरशीने होईल.

३ थेट सरपंच आणि २६ ग्रामपंचायतींच्या २९ जागांसाठीही पोटनिवडणूक होणार आहे. गतवर्षी झालेल्या निवडणुकांमधून ओबीसी आरक्षण वगळल्याने स्थगित केलेल्या कुंडल, हरिपूर, नांद्रे, मळणगाव व चिंचोळे या ग्रामपंचायतींची रणधुमाळी होणार आहे.

कोल्हापुरात वातावरण ढवळून निघणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२३ यादरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने झालेल्या आणि २०२२ मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणूक घेता न आलेल्या अशा सदस्य आणि थेट सरपंचपदांसाठी संगणकप्रणालीद्वारे निवडणूक होणार आहे.

जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांसाठी निवडणूक होणार असून त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघणार आहे. थेट सरंपच निवडीमुळे इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT