Maharashtra Election 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Vidarbha Voter Turnout : पश्चिम विदर्भात मतदानाचा टक्का वाढीची शक्यता

Maharashtra Election 2024 : विधानसभेच्या निवडणुकीसाठी बुधवारी (ता.२०) अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांतील १५ मतदार संघांत मतदान झाले.

Team Agrowon

Akola News : विधानसभेच्या निवडणुकीसाठी बुधवारी (ता.२०) अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांतील १५ मतदार संघांत मतदान झाले. या वेळी मतदारांनी सकाळपासूनच उत्साह दाखवला. मतदान प्रक्रिया सुरू होताच केंद्रावर रांगा लागणे सुरू झाले होते.

दुपारी तीन वाजेपर्यंत अकोला जिल्ह्यात ५६.१६ टक्के, बुलडाणा जिल्ह्यात ६२.८४ टक्के, तर वाशीम जिल्ह्यात ५७.४२ टक्के मतदान झाले होते. मतदानासाठी दुपारनंतर खऱ्या अर्थाने रांगा लागलेल्या दिसून आल्या. या वेळी मतदानाची टक्केवारी वाढण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

अकोल्यात सकाळी काही केंद्रावर ईव्हीएम यंत्रणेत बिघाड झाल्याचे समोर आले होते. मात्र, प्रशासनाने तातडीने संबंधित यंत्रे बदलून तेथे मतदान सुरळीत केले. यात अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदार संघातील वाडेगाव, तसेच अकोला पश्चिम मतदार संघातील बी. आर. स्कूल येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम यंत्रणेतील बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांत मतदान केंद्रांवर मतदान सुरळीत सुरू झाले.

अकोला जिल्ह्यात पाच मतदार संघांसाठी मतदान झाले. अकोला पूर्व, अकोला पश्चिम, बाळापूर, मूर्तिजापूर आणि अकोट या मतदार संघांचा समावेश होता. बुलडाणा जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर, खामगाव, मेहकर, सिंदखेडराजा आणि जळगाव जामोद तर वाशीम जिल्ह्यात रिसोड-मालेगाव, कारंजा आणि वाशीम अशा १५ मतदार संघांसाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली.

या वेळी प्रशासनाने मतदारांना केंद्राकडे आकर्षित करण्यात सुरुवातीपासून जनजागृती केली. तसेच मतदानाच्या दिवशी काही आकर्षक केंद्रही तयार केले होते. विशिष्ट थीम घेत केंद्र बनवण्यात आले होते. विशेषतः महिलांसाठी स्वतंत्र मतदान केंद्र, सर्व महिला कर्मचाऱ्यांचीच नेमणूक, पिंक मतदान केंद्र, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा, तसेच सामान्य मतदारांना पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी मंडप उभारण्यात आले होते.

मतदान यादीत नावे नसल्याने काही केंद्रांवर मतदारांच्या तक्रारीही आल्या. प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त तर होताच शिवाय मोबाईल आत नेण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने अनेकांचा हिरमोडही झाला. केंद्राच्या ठिकाणी मोबाईल ठेवण्याची सुविधा नसल्याचा फटका अनेकांना बसला.

अटी-तटीच्या लढती

यावेळी प्रत्येक मतदार संघात मतविभाजनाचा मोठा फटका प्रमुख उमेदवारांनाही बसण्याची चिन्हे आहेत. उमेदवारांची संख्या प्रत्येक ठिकाणी वाढल्याने तसेच प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जातीय, धार्मिक ध्रुवीकरणाला प्रोत्साहन दिल्याने मतदार नेमके काय कौल देतात हे पाहणे उत्सुकतेचे बनलेले आहे.

या भागात अकोला पश्चिम, बाळापूर, खामगाव, बुलडाणा, चिखली, सिंदखेडराजा, जळगाव जामोद या काही मतदार संघांत प्रचंड अटीतटीचा सामना रंगणार आहे. मतदारांनी कुणाच्या पारड्यात आपले मत दिले हे शनिवारी (ता.२३) होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होईल.

उमेदवारावर हल्ला

जळगाव जामोद (जि. बुलडाणा ) मतदार संघातील परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार, शेतकरी नेते प्रशांत डिक्कर यांच्या वाहनावर अज्ञातांनी बुधवारी (ता.२०) पहाटेच्या सुमारास दगडफेक केली. शेगाव-वरवट बकाल मार्गावर कालखेड नजीक हा हल्ला करण्यात आला. यात गाडीच्या काचा फुटल्या. डोक्याला दगड लागल्याने डिक्कर रक्तबंबाळ झाले होते. त्यांना तातडीने सुरुवातीला शेगाव व नंतर अकोला येथे भरती करण्यात आले. या हल्ल्यामागे नेमके कोण आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT