Sugarcane Crushing  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Bill : ‘विठ्ठलराव शिंदे’कडून २८०० रुपयांप्रमाणे ऊसबिल जमा

Sugarcane Season : या हंगामात युनिट नंबर एककडे प्रतिदिन चौदा ते साडे चौदा हजार व युनिट नंबर दोनकडे साडेचार ते पाच हजार मेट्रिकटन गाळप होत आहे. युनिट नंबर एक येथे आतापर्यंत ८ लाख ८८ हजार मेट्रीकटन ऊस गाळप झाले आहे.

Team Agrowon

Solapur News : पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर एक पिंपळनेर व युनिट नंबर दोन करकंब कारखान्याचे ११ ते २० जानेवारी अखेर प्रतिटन २८०० रुपयांप्रमाणे ऊस बिल शेतक-यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आले आहे.

या हंगामात आजपर्यंत ऊस बिलापोटी ३३२ कोटी ७६ लाख रुपयांचे वाटप केले असल्याची माहिती साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, बबनराव शिंदे यांनी पत्रकारांना दिली. श्री. शिंदे म्हणाले, या हंगामात युनिट नंबर एककडे प्रतिदिन चौदा ते साडे चौदा हजार व युनिट नंबर दोनकडे साडेचार ते पाच हजार मेट्रिकटन गाळप होत आहे.

युनिट नंबर एक येथे आतापर्यंत ८ लाख ८८ हजार मेट्रीकटन ऊस गाळप झाले आहे. युनिट नंबर २ येथे आतापर्यंत ३ लाख मेट्रिकटन उसाचे गाळप झालेले आहे. दोन्ही युनिटचे मिळून ११ लाख ८८ हजार ४३२ मेट्रिकटन उसाचे गाळप झाले आहे.

या गळीत हंगामामध्ये युनिट नंबर एक पिंपळनेर व युनिट नंबर दोन करकंबकडे ११ ते २० जानेवारी या कालावधीत गाळपास आलेल्या सहाव्या १० दिवसाच्या उसास प्रतिटन २८०० रुपयेप्रमाणे पेमेंट शेतकऱ्यांच्या-यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.

या हंगामात आतापर्यंत कारखान्याने ऊस बिलापोटी ३३२ कोटी ७६ लाख रुपये अदा केले आहेत. ३१ डिसेंबर अखेर ऊस तोडणी वाहतूक बिलेही अदा करण्यात आलेली असून उर्वरित बिले अदा करणेची दृष्टीने कार्यवाही सुरू आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष वामनराव उबाळे, कार्यकारी संचालक एस.एन.दिग्रजे, जनरल मॅनेजर एस.आर.यादव व इतर अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT