Sugarcane Crushing  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing Target : विश्वास कारखान्याचे दहा हजार टन गाळपाचे उद्दिष्ट

Sugarcane Season 2025 : येत्या दोन वर्षांत ‘विश्वास’ कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिनी दहा हजार टन करण्याचे उद्दिष्ट आहे.

Team Agrowon

Sangli News : येत्या दोन वर्षांत ‘विश्वास’ कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिनी दहा हजार टन करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने आधुनिकीकरण हाती घेतल्याची माहिती अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली. चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक कारखान्याच्या २०२४-२५ गळीत हंगामाच्या सांगता समारंभात नाईक बोलत होते.

ते म्हणाले, की उसाची उपलब्धता पाहता आता साखर कारखानदारीचे हंगाम १०० ते १२० दिवसांपर्यंत चालतील असेल चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे कमी कालावधित जास्तीचे गाळप करणे, हा एकमेव पर्याय कारखानदारांपुढे राहील.

त्याचा विचार करून यंत्रणेचे आधुनिकीकरण हाती घेतले आहे. पुढील वर्षे प्रतिदिनी एकूण साडेसात हजार टनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी पाच ते साडेपाच हजार टनांच्या गाळपातून साखरनिर्मिती तर, २ हजार टनांच्या गाळपातून इथेनॉल किंवा ईएनएनिर्मिती होईल. त्यासाठी आसवनी प्रकल्पाचा बॉयलर व टर्बाइन वेगळे राहील.

आगामी दोन वर्षांत गाळप क्षमता १० हजार टनापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रणेचे आधुनिकीकरण हाती घेतले आहे. सह विजनिमिर्ती प्रकल्पाची क्षमता वाढ करून २२ मेगावॉट निर्मिती होत आहे.

आसवनी प्रकल्प क्षमता प्रतिदिनी १ लाख ५ हजार लीटरवर नेली आहे. ती भविष्यात १ लाख ८० हजारापर्यंत नेण्याचा मानस आहे. प्रारंभी संचालक विराज नाईक यांच्या हस्ते गव्हाण पूजन करण्यात आले.

सौ. ज्योती व संचालक दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते साखर पोती पूजन झाले. प्रास्ताविक शेती समितीचे अध्यक्ष संचालक शिवाजी पाटील यांनी केले. कार्यकारी संचालक अमोल पाटील, कारखाना व्यवस्थापक दीपक पाटील, सचिव सचिन पाटील, ए. एस. पाटील आदी उपस्थित होते. संचालक विश्वास पाटील यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Crisis: कितीही संकटे आली तरी शेतकरी उमेद हारत नाही : आसाराम लोमटे

October Crop Loss: पावसामुळे ऑक्टोबरमध्ये ७४३६ हेक्टरला फटका

Sugarcane Price Protest: ...तर ‘त्या’ कारखान्यांवर हल्लाबोल आंदोलन : शेट्टी

CCI Rules: ‘सीसीआय’च्या अटी पूर्ण करताना दमछाक

Maharashtra Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार

SCROLL FOR NEXT