Kharif Planning Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season 2025 : विक्रमगडमध्ये खरिपाच्या तयारीला वेग

Kharif Planning : यंदा विक्रमगडमध्ये खरीप हंगामात सुमारे सात हजार ५२० हेक्टरवर भातपेरणी केली जाणार आहे. त्यामुळे पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

Team Agrowon

Palghar News : विक्रमगड तालुक्यात ९४ पैकी ८६ गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते. यंदा विक्रमगडमध्ये खरीप हंगामात सुमारे सात हजार ५२० हेक्टरवर भातपेरणी केली जाणार आहे. त्यामुळे पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. यासाठी सुमारे ३०१ टन भाताचे बियाणे लागणार असल्याची माहिती तालुका कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच दोन हजार ६१५ टन खतांची मागणी असणार आहे, असे सांगण्यात आले.

यंदाचा पावसाळा सुरू होण्यासासाठी महिनाभराचा कालावधी उरला आहे. या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील तालुक्यातील पेरणीचे नियोजन, त्यासाठी लागणारे बियाणे आणि खतसाठ्याच्या मागणीचे नियोजन तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले आहे. परिणामी शेतकऱ्यांना अडचण निर्माण होणार नसल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

आजच्या महागाईच्या जमान्यात जास्त उत्पन्न देणारी कमी खर्च आणि अल्प मेहनतीने आधुनिक अवजारांचा वापर करून शेती करणे गरजेचे झाले आहे. यासाठी सरकारनेही शेतकऱ्यांकरिता अनेक योजना आणल्या आहेत, पण त्याचा योग्यरित्या फायदा विक्रमगड, जव्हार, मोखाडा या भागातील शेतकऱ्यांनी झाला नसल्याने अनेक प्रश्न आजही सुटलेले नाहीत. आता शेतकऱ्यांनी सरकारच्या मदतीची वाट न बघता शेतीचे स्वरूप बदलावे, असे आवाहन तज्ज्ञ शेतकरी मंडळीकडून करण्यात येत आहे.

आज फुलशेती, हळदशेती, मस्यशेतीलासुद्धा चांगला वाव आहे. काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ही शेती केली जात आहे. विक्रमगड तालुक्यातील ८६ गाव-पाड्यांतील सात हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रांवर कंपन्यांची सुधारित भातांच्या विविध वाणांची लागवड केली जात आहे. आता शेतकरी जुनाट वाणांची लागवड न करिता सुधारित वाणांची लागवड करून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

बनावट खतांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल. जिल्हास्तरीय विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना कृषी बी-बियाणे, खते देताना फसवणूक होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा कृषी अधीक्षक नीलेश भागेश्वर यांनी दुकानदारांना केल्या आहेत.

खरीप हंगामपूर्व कृषी प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हा अधीक्षक आणि कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या बिरसा मुंडा सभागृहात कार्यशाळा पार पडली. या वेळी ते बोलत होते. खरीप हंगामासाठी अनुदानित रासायनिक खतांचा साठा आवश्यकतेनुसार, तसेच भातशेती लागवडीच्या महिन्यात करून ठेवण्याच्या सूचना भागेश्वर यांनी केले.

तसेच खताचा वापर, तसेच मात्रेबाबतचा फलक ग्रामपंचायत, तसेच खते विक्री केंद्रावर दर्शनी भागावर लावावा, साथी पोर्टलवरून बियाणे विक्री करण्याकरिता आनुषंगिक माहिती द्यावी, अशा सूचना भागेश्वर यांनी केल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Market Road Issues: विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटच्या सुविधांवर पाणी

Fake Fertilizer: बोगस खतविक्रीप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

Vanashree Award: भोकणीला वन विभागाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी धुळ्यातून २१५ विशेष बस

Agrowon Podcast: हरभरा दरात चढ-उतार ,ज्वारीच्या आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार, शेपू दरात स्थिरतातर केळीच्या आवकेत घट

SCROLL FOR NEXT