Nagpur Winter Session Agrowon
ॲग्रो विशेष

Winter Session : पीक विमा योजनेतून फायदा कोणाला ? विजय वड्डेटीवार यांचा सरकारला सवाल

Maharashtra Assembly Winter Session : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी अवकाळी पाऊस आणि पीक विम्याच्या मुद्द्यावर सरकारवर सडकून टिका केली.

Swapnil Shinde

Nagpur Adhiveshan : राज्यात दुष्काळामुळे शेतकरी होरपळा असताना त्याच्यावर अवकाळी पावसाचे संकट ओढावले आहे. हातातोंडा आलेली पिके वाया गेली असून शेतकऱ्यांचे सरकारच्या मदतीकडे लक्ष लागले आहे.सरकारने १ रुपयात विमा उतरवला आणि स्वतःची पाठ थोपटून घेतली. मात्र, शेतकऱ्याला मदतीची गरज असताना पीक विमा कंपन्यांकडून तुटपुंजी मदत केली जात आहे. पीक विमा योजनेतून फायदा कोणाला ? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केला.

नागपूर येथील विधीमंडळाच्या दुसऱ्या दिवशी स्थगन प्रस्ताव मांडत विजय वड्डेटीवार म्हणाले, रब्बी हंगामात पीक विम्यासाठी शेतकरी हिस्सा १ कोटी ७१ लाख रुपये, राज्य सरकारचा हिस्सा ४ हजार ६८३ कोटी रुपये, केंद्राचा हिस्सा ३ हजार २०३ कोटी रुपये असा एकूण ८ हजार १५ कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना देण्यात आले. तर कंपन्यांनी शेतकऱ्यांना २ हजार २१ कोटी रुपये मंजूर झाले. त्यापैकी १३७९ कोटी रुपये दिले. अजूनही ७३२ कोटी रुपये देणे बाकी आहे. या योजनेत पीक विमा कंपन्यांना ६ हजार १५ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. त्यामुळे ही योजना कोणच्या फायद्याचे आहे, असा सवाल केला.

गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. कापूस, धान, कांदा, द्राक्षसह भाजीपाला पिके भुईसपाट झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये पंचनामे करत असताना सरकार उदासीन आहे. अंदाजे ६ लाख ३१ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. मात्र, अजूनही निम्मे पंचनामे पूर्ण झाले नाही. अधिकारी वेळकाढूपणा का करत आहे? अधिकारी सरकारचे एेकत नाहीत का? असा प्रश्नांचा भडीमार केला. तसेच सरकारने शेतकऱ्यांना मदतीच्या दृष्टीने या विषयावर चर्चा करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT