Swapnil Shinde
महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरात आजपासून सुरुवात झाली.
दरम्यान, काल सरकारच्यावतीने आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता.
शेती नुकसानीच्या भरपाई मुद्द्यावर विरोधी पक्षांने आक्रमक भूमिका घेतली.
संत्र्यांची माळ गळ्यात घालून गुरुवारी महाविकास आघाडीच्या आमदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले.
हातामध्ये सरकारच्या धोरणाचा निषेध करत आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केले.
अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे जे नुकसान झाले आहे, त्या संदर्भात चर्चा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थगन प्रस्तावाद्वारे विरोधकांकडून करण्यात आली.
विरोधकांच्या प्रस्तावावर सरकारच्यावतीने चर्चा किंवा निवेदन करण्यास टाळण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला.