Vidarbha Cold Wave agrowon
ॲग्रो विशेष

Vidarbha Cold Wave : महाबळेश्वरपेक्षा विदर्भात थंडी वाढली, नागपुरात तीव्र लाट येण्याची शक्यता

Nagpur Winter : गारठ्यामुळे यंदाच्या हिवाळ्यात नागपूरचे तापमान प्रथमच दहा अंशांच्या आत नोंदवले गेले आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Cold Wave : राज्यात सर्वाधिक थंडी मिनी काश्मिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये जोरदार थंडी पडत असते परंतु यंदा अल् निनोमुळे पावसासोबत थंडीही कमी असल्याचे हवामान तज्ज्ञांनी माहिती दिली. दरम्यान अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दिसून येत आहे. यंदा विदर्भात थंडीचा कडाका वाढला असून, नागपूरसह संपूर्ण विदर्भात तीव्र लाट पसरली आहे.

गारठ्यामुळे यंदाच्या हिवाळ्यात नागपूरचे तापमान प्रथमच दहा अंशांच्या आत नोंदवले गेले आहे. महाबळेश्वरपेक्षाही नागपूरची थंड शहर म्हणून नोंद झाली. या आठवड्यात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.

कडाक्याच्या थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भवासीयांना आता खऱ्या अर्थान तीव्र हिवाळा जाणवू लागला आहे. याचा अनुभव दोन दिवसांपासून नागपूरकरांनाही येत आहे. कालपासून अचानक किमान तापमानात ३.४ अंशांची घसरण होऊन पारा या मोसमात प्रथमच ९.४ अंशांवर आला. उल्लेखनीय म्हणजे, उपराजधानीत नोंद झालेले हे किमान तापमान राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून गणल्या जाणाऱ्या महाबळेश्वरपेक्षाही (१२.६ अंश सेल्सिअस) तीन अंशांनी कमी होते.

राज्यात सर्वाधिक थंडीची लाट सध्या विदर्भातच दिसून येत आहे. मागच्या २४ तासांत गोंदिया व यवतमाळ येथे विदर्भासह संपूर्ण राज्यात निचांकी अर्थात ९.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये लाटेचा तीव्र प्रभाव दिसून येत आहे.

कडाक्याच्या थंडीमुळे ग्रामीण भागातीलच नव्हे तर शहरवासीयही सध्या कमालीचे त्रस्त आहेत. दिवसाही बोचरे वारे वाहत असल्यामुळे स्वेटर व जॅकेट घालून फिरावे लागत आहे. शिवाय थंडी घालविण्यासाठी शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे. हवामान विभागाने या आठवड्यातही थंडीची लाट कायम राहणार असल्याचे संकेत दिल्याने सध्यातरी कडाक्यापासून वैदर्भीची सुटका शक्य नाही.

उत्तर भारतात सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू असल्यामुळे मैदानी भागांमध्ये थंडीची लाट आली असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

विदर्भातील जिल्हा किमान तापमान

गोंदिया ९.०, यवतमाळ ९.०, नागपूर ९.४, वाशीम १०.०, गडचिरोली १०.६, चंद्रपूर ११.०, ब्रम्हपुरी ११.४, वर्धा ११.४, अमरावती १२.५, बुलडाणा १२.८, अकोला १३.५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT