Ladki Bahin Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

Ladki Bahin Yojana : सोलापूर जिल्ह्यात १२ हजार ५०० महिलांमुळे ११ लाख ‘लाडक्या बहिणी’ ‘वेटिंग’वर

Ladki Bahin Scheme Verification : सोलापूर जिल्ह्यातील साडेपाच लाख महिलांनी स्वत:च्या मोबाईलवरून अर्ज केले असून त्यांना अंगणवाडी सेविकांनीही मदत केली. तर अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार केल्यावर त्यावर साडेसहा लाख महिलांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज केले होते.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यातील ११ लाख सहा हजार महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. त्यापैकी महिला व बालकल्याण विभागाकडून जिल्ह्यातील साडेबारा हजार महिलांची यादी अधिकाऱ्यांना प्राप्त झाली असून त्यांच्याकडील चारचाकी वाहनांची पडताळणी अंगणवाडी सेविका करीत आहेत. त्या साडेबारा हजार महिला लाभार्थींची पडताळणी पूर्ण न झाल्याने जिल्ह्यातील ११ लाख महिलांचा फेब्रुवारीचा लाभ थांबला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील साडेपाच लाख महिलांनी स्वत:च्या मोबाईलवरून अर्ज केले असून त्यांना अंगणवाडी सेविकांनीही मदत केली. तर अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार केल्यावर त्यावर साडेसहा लाख महिलांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज केले होते.

त्यांना १ जुलैपासून योजनेचा लाभ सुरू झाला, पण आता विधानसभा निवडणुकीनंतर निकषांनुसार लाभार्थींची पडताळणी सुरू केल्याने अनेकांची झोप उडाली आहे.

दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे, पण आता फेब्रुवारी संपला तरीदेखील लाडक्या बहिणींना या महिन्याचा लाभ मिळालेला नाही. आता मार्च महिन्यात दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्रित दिला जाणार असून तोवर चारचाकी वाहने असलेल्या लाडक्या बहिणींची पडताळणी देखील पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

५२ ‘लाडक्या बहिणीं’नी नाकारला लाभ

कागदपत्रांची सवलत, स्वत:च्या मोबाईलवरून अर्ज भरण्याची सोय आणि मदतीला अंगणवाडी सेविका दिल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसलेल्यांनीही त्यावेळी अर्ज केले.

पण, आता भविष्यातील कारवाईच्या भीतीने व सध्या पडताळणी सुरू झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील ५२ महिलांनी ऑफलाइन अर्ज करून योजनेचा लाभ बंद करण्याची विनंती केली आहे. त्यासाठी त्यांनी स्वत:ला नोकरी लागली, पतीला चांगला जॉब लागल्याने उत्पनात वाढ झाल्याची कारणे दिली आहेत. काहींनी कारण न देता लाभ बंद करावा, असे अर्ज केले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT