Agriculture Labor  Agrowon
ॲग्रो विशेष

Vegetable Cultivation : सांगलीत भाजीपाला लागवड घटण्याचा अंदाज

Vegetable Farming : यंदा जिल्ह्यात फेब्रुवारीच्या मध्यापासून तापमानाचा पारा वाढू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ३६ ते ३७ अंश इतके तापमान झाले आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढत आहे. याचा फटका भाजीपाला लागवडीसह रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीला बसू लागला आहे. दिवसभर उन्हाचा तडाखा आणि सकाळी पडणारी थंडी यामुळे भाजीपाल्यावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यातच फूळकळी निघण्यास अडचणी येऊ लागल्या असून अपेक्षित फळ धारणा होत नाही.

वाढत्या तापमानामुळे पिकांची होरपळ होण्यास सुरुवात झाली असून भाजीपाल्याची लागवड घटण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा जिल्ह्यात फेब्रुवारीच्या मध्यापासून तापमानाचा पारा वाढू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ३६ ते ३७ अंश इतके तापमान झाले आहे.

दरम्यान, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत भाजीपाला लागवडीसाठी शेतकरी पुढे आले असल्याने रोपांनाही चांगली मागणी होतो. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून भाजीपाल्याच्या रोपांच्या मागणीत किंचित घट झाली आहे.

त्यातच बदलत्या वातावरणामुळे काही प्रमाणात फूळकळी निघण्यास अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. तसेच पांढरी माशीचाही प्रादुर्भाव दिसून येऊ लागला, त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.

जिल्ह्यातील दु्ष्काळी पट्ट्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक तापमानाचा फटका पशुधनासह पिकांना बसतो. यंदाही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच वाढत्या तापमानाचा फटका बसू लागला आहे. या भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

गतवर्षी सर्वदूर सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी पुरेसा पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे आतापासून पाण्याची परिस्थिती कठीण होत चालली आहे. परंतु मार्चनंतर रोपांची मागणी कमी राहील. त्यामुळे लागवड कमी होईल. बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. कमाल तापमानात वाढले असल्याने ऊन वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी, मजुरांनी शेतीकामांचे वेळापत्रकही बदलले आहे.

फळ पिकांना सनबर्निंग

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ३५.८ ते ३७.२ अंश सेल्सिअस तापमान होते. या वाढत्या तापमानामुळे पेरू, डाळिंब, यासह अन्य फळ पिकांना सनबर्निंगचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. तसेच झाडावर ताण येतो. फळाचा आकार कमी होणे, रंग न येणे अशा समस्या आहेत.

जिल्ह्यातील तापमान स्थिती

वार किमान कमाल

बुधवार (ता. १९) ३७.१ २०.१

गुरुवार (ता. २०) ३६.६ २०.०

शुक्रवार (ता. २१) ३७.२ २०.१

शनिवार (ता. २२) ३६.५ १८.९

रविवार (ता. २३) ३५.८ १८.३

सोमवार (ता. २४) ३६.८ १९.२

(स्रोत : ग्रामीण कृषी हवामानशास्त्र प्रकल्प, विभागीय कृषी संशोधन केंद्र, शेंडा पार्क कोल्हापूर)

फूलगळ होऊ लागली असून फळांची धारणा होत नाही. रात्रीची थंडी दिवसा तापमान वाढत असल्याने रोगाचा प्रादुर्भाव वाढ आहे. त्यामुळे उत्पादन घट होणार आहे.
- राहुल कदम, भाजीपाला उत्पादक शेतकरी, भुड, जि. सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

Crop Damage: मे, जूनमध्ये पावसामुळे ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; कृषी विभागाची माहिती

Goras Bhandar Closure: गोरस भंडारावर कारवाई; दररोज होणाऱ्या ३ हजार ५०० लिटर दूध संकलनावर परिणाम

Offline Fertilizer Purchase: ...तोपर्यंत ऑफलाइन खत खरेदी सुरू ठेवा: शेतकरी संघटना

Banana Rate: खानदेशात केळी दर २९०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT