Seed Production Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Production : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर ८०० हेक्टरवर बीजोत्पादन

VNMKV, Parbhani : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील मध्यवर्ती प्रक्षेत्रावर २०२४-२५ मध्ये खरीप व रब्बी हंगामात मिळून ८०० हेक्टरवर विविध पिकांचा पैदासकार बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येत आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील मध्यवर्ती प्रक्षेत्रावर २०२४-२५ मध्ये खरीप व रब्बी हंगामात मिळून ८०० हेक्टरवर विविध पिकांचा पैदासकार बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्यात खरिपातील ५०० हेक्टर आणि रब्बीतील ३०० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

यंदा मराठवाड्यातील विविध ठिकाणच्या प्रक्षेत्रावरील मिळून एकूण १ हजार ३०० हेक्टरवर बीजोत्पादन घेण्यात येत आहे. २०२३-२४ मध्ये खरीप व रब्बी हंगामामध्‍ये सुमारे ९ हजार १५४.८४ क्विंटल बियाणे उत्पादन झाले. तुलनेने बीजोत्पादनात ३० टक्के वाढ झाली. विद्यापीठाने विकसित केलेल्या सोयाबीन, तूर, ज्‍वारी आदी पिकांच्या सरस वाणांना मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांची पसंती आहे. शेतकऱ्यांना बियाणे पुरवठा करण्यासाठी बीजोत्पादन क्षेत्रात वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

मध्यवर्ती प्रक्षेत्रावर  १९७२ ते २००१ दरम्‍यान बीजोत्‍पादन घेतले जात होते.परंतु गेल्‍या काही वर्षांपासून निधी व मनुष्‍यबळ अभावी यातील बहुतांश क्षेत्र लागवडीखाली आणण्‍यात अडचणी निर्माण झाल्‍या. मागील दोन वर्षांत कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांनी बीजोत्‍पादन वाढीसाठी विशेष लक्ष दिले. पडीक जमीन लागवडीखाली आणली. अपुरे मनुष्यबळ, निधी, वन्य प्राण्याचा उपद्रव, नैसर्गिक संकटांना सामोरे जात तसेच उपलब्ध साधनसमग्रीमध्ये पैदासकार बीजोत्‍पादन घेण्‍यात येत आहे. याशिवाय विद्यापीठ परिसर व मराठवाड्यातील विद्यापीठाच्‍या विविध प्रक्षेत्रांवरील १२० हेक्टर एकर जमीन वहितीखाली आली.

नवीन चार शेततळी निर्माण तसेच जुन्या शेततळ्याची दुरुस्ती करण्‍यात आली आहे. या माध्यमातून ८ ते ९ कोटी लिटर पाण्‍याची साठवण क्षमता शक्‍य होत आहे. काही प्रक्षेत्रावर संरक्षित सिंचन देणे शक्य होत आहे. पायाभूत सुविधा विकास, शेततळे निर्मिती करून सिंचन क्षेत्रात वाढ, ड्रोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञाचा वापर, यांत्रिकीकरणावर भर देण्यात येत आहे. या वर्षी प्रथमच २०० हेक्टर क्षेत्रावर ड्रोनद्वारे फवारणी करण्यात आली. यंदा खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामातील मिळून निर्धारित लक्ष गाठण्यास विद्यापीठास नक्कीच यश मिळेल, असा विश्‍वास कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केला आहे.

सोयाबीनचे सुमारे ८ हजार ५०० क्विंटल बियाणे तयार
यंदा बीजोत्‍पादन २० हजार क्विंटल करण्‍याचे लक्ष ठेवले आहे. त्यात सोयाबीनचे सुमारे ८ हजार ५०० क्विंटल बियाणे मराठवाड्यातील विद्यापीठाच्या ५१ संशोधन आणि प्रक्षेत्रावर तसेच वेगवेगळ्या जमिनीमध्ये तसेच हवामानामध्ये तयार झाले. मध्यवर्ती प्रक्षेत्राच्या ३५० हेक्टरवर ३ हजार ५०० क्विंटल सोयाबीनचे बीजोत्‍पादन मिळाले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या उद्दिष्टानुसार सोयाबीनचे पैदासकार बीजोत्‍पादन हेक्टरी १० क्विंटल मिळाले आहे. काही केंद्रांनी हेक्टरी २० ते २५ क्विंटल उत्पादन घेतले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Agrowon Podcast: गहू दरात चढ-उतार, सोयाबीन आवकेत वाढ, काकडी दर स्थिर, लिंबू दरात घसरण तर कोथिंबीर दरात बदल

Karj Mukti Yojana : आधार प्रमाणीकरणानंतरच कर्जमुक्तीची रक्कम खात्यात जमा होणार

Maize Ethanol Project: महाराष्ट्रात उभारणार मका पीक आधारित नवा इथेनॉल प्रकल्प, राज्य सरकारकडून ११५ कोटी निधीला मुंजरी

Cotton Farming Guidance: कोंढवड येथे कापूस उत्पादकांना शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT