Wakhar Corporation Agrowon
ॲग्रो विशेष

Wakhar Corporation : वखार महामंडळाची शेतमाल साठवणूक क्षमता वाढली

Pune News : दीपक तावरे ः अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सेवागौरव

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Grain Storage : पुणे : ‘‘महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने नाफेड आणि भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) शेतीमाल साठवणुकीशिवाय आपल्या साठवणूक क्षमतेत भरीव वाढ केली आहे. त्यामुळे स्पर्धेच्या काळात महामंडळाची व्यवसायभिमुखता आणखी वाढली आहे.

त्यात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही वाटा आहे,’’ असे प्रतिपादन महामंडळाचे माजी अध्यक्ष दीपक तावरे यांनी केले.

महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी तावरे यांनी ३० मे २०२० ते २१ मे २०२३ पर्यंत केलेल्या सेवेबद्दल मंडळाच्या मुख्यालय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सेवा गौरव सोहळा बुधवारी (ता. २७) आयोजित करण्यात आला.

या वेळी मंडळाचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीण कुमार देवरे, सहव्यवस्थापकीय संचालक दीपक शिंदे, अभियांत्रिकी विभागाचे महाव्यवस्थापक संजय सैंधाणे, सुरेश वालगुडे, उपमहाव्यवस्थापक ज्योती कावरे, महाव्यवस्थापक अविनाश पांडे, उपमहाव्यवस्थापक प्रशांत बारवकर आदी उपस्थित होते.

श्री. तावरे म्हणाले, ‘‘महामंडळाकडून लॉजिस्टिक पार्कची सुरू असलेली उभारणी ही काळानुरूप घेतलेला उत्तम निर्णय आहे. भविष्याचा वेध घेऊन आणखी असे उत्पन्न वाढीचे नवे प्रकल्प हाती घेण्याची आवश्यकता आहे.

पशुखाद्य, बियाणे व अन्य व्यवसाय मिळविण्यातही महामंडळाला यश आले. सध्याची कर्मचारी, अधिकाऱ्यांची कमतरता भरून निघणे आवश्यक आहे.’’

डॉ. देवरे म्हणाले, ‘‘महामंडळाचे सुरू असलेले चांगले काम पुढे नेण्याचा मी प्रयत्न करेन. गोदामांमध्ये स्पर्धेचा काळ वाढला असून नवनव्या योजनांद्वारे महामंडळाला उच्च स्थानावर नेण्यास मी प्राधान्य देईन.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Digital Agriculture Policy: डिजिटल सुसूत्रीकरणाचे स्वागतच!

Drought Relief: आंबेगावातील बाधित शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार : दिलीप वळसे पाटील

Chana Variety: परभणी चना-१७ वाणाची पूर्व मध्य विभागासाठी शिफारस

Onion Market Update: खरीप लाल कांद्याच्या आवकेत ७५ टक्के घट

Agricoss Day: डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त २७ डिसेंबरला राज्य अॅग्रीकॉस दिन

SCROLL FOR NEXT