Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Water Storage : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ९० टक्क्यांवर

Water Stock : मराठवाड्यातील एकूण ८७९ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणी साठा ९०.८२ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील एकूण ८७९ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणी साठा ९०.८२ टक्क्यांवर पोहोचला आहे. ११ पैकी तब्बल ८ मोठे प्रकल्प तुडुंब असून २७ मध्यम प्रकल्पात १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, मांजरा, ऊर्ध्व पैनगंगा, निम्न तेरणा, विष्णुपुरी व सीना कोळेगाव हे प्रकल्प तुडुंब झाले आहेत. दुसरीकडे मोठ्या प्रकल्पांपैकी माजलगावमध्ये ८० टक्के, निम्नमनारमध्ये ९७ टक्के तर निम्न दुधना प्रकल्पात ७५ टक्के उपयुक्त पाणी साठा झाला आहे.

७५ माध्यम प्रकल्पांपैकी बीडमधील १६, नांदेडमधील ९ व परभणीतील २ मध्यम प्रकल्पात १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. याशिवाय धाराशिवमधील १७ मध्यम प्रकल्पात ८४ टक्के, लातूरमधील ८ मध्यम प्रकल्पात ८० टक्के ,छत्रपती संभाजीनगर मधील १६ व जालन्यातील ७ मध्यम प्रकल्प सरासरी ६३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

७५१ लघू प्रकल्पांपैकी हिंगोलीतील २७ प्रकल्पात ९२ टक्के, नांदेडमधील ८० प्रकल्पात ९७ टक्के, परभणीतील २२ प्रकल्पात ९० टक्के, लातूरमधील १३५ प्रकल्पात ९१ टक्के, धाराशिवमधील २०६ प्रकल्पात ६८ टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पात ८४ टक्के, जालन्यातील ५७ प्रकल्पात ६० टक्के तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९८ लघू प्रकल्पात सर्वात कमी ५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला, असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

३१ लघू-मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखालीच

मराठवाड्यातील एकूण ७५ मध्यम प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी एक प्रकल्पातील पाणीसाठा अजूनही ज्योत्याखालीच आहे याशिवाय २९ लघू प्रकल्पातील पाणीसाठाही जोत्याखालीच आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील सर्वाधिक १६, त्यापाठोपाठ धाराशिवमधील ९, जालन्यातील २ तसेच बीड व लातूर मधील प्रत्येकी एका लघूप्रकल्पाचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurement Stop: कापूस संकटात; सीसीआयची  खरेदी आजपासून बंद, मुख्यमंत्र्यांच्या मागणीनंतरही मुदतवाढ नाही

Single Women Survey: मराठवाड्यात ग्रामपंचायतस्तरावर ४.९३ लाख एकल महिलांची नोंद

Delhi Excise Policy Case : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल, सिसोदिया निर्दोष, अश्रू अनावर

Warehouse Receipt: बुर्किना फासो गोदाम पावतीवर व्यवहार

Water Conservation: वृक्षारोपण, जलसंवर्धनाचा प्रोत्साहक योद्धा

SCROLL FOR NEXT