Marathwada Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Water Storage: मराठवाड्यात प्रकल्पांमधील उपयुक्त साठा ८८ टक्क्यांवर

Dam water levels in Marathwada: मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह विविध नद्यांवरील बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा ८८.७३ टक्क्यांवर पोहोचला आहे

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह विविध नद्यांवरील बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा ८८.७३ टक्क्यांवर पोहोचला आहे. ७ मोठ्या प्रकल्पांत १०० टक्क्यांवर उपयुक्त पाणीसाठा झाला असून ४१ मध्यम प्रकल्प तुडुंब झाले आहेत.

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत ९६.६१ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. दुसरीकडे ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये ७७.५२ टक्के, ७५१ लघू प्रकल्पांमध्ये ७३.२१ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमध्ये ७६.७५ टक्के तर तेरणा, मांजरा, रेना नदीवरील २७ बंधाऱ्यांमध्ये ८२.४० टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

७ मोठ्या प्रकल्पांत १०० टक्के उपयुक्त साठा मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी सात प्रकल्पांत १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्यामध्ये जायकवाडी, सिद्धेश्वर, मांजरा, उर्ध्व पेनगंगा, निम्न मनार, विष्णुपुरी व सीना कोळेगाव या प्रकल्पांचा समावेश आहे.

याशिवाय निम्न तेरणा प्रकल्पात ९७ टक्के, येलदरीत ९६ टक्के, निम्न दुधना प्रकल्पात ७५ टक्के, माजलगाव प्रकल्पात सर्वांत कमी ७४ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील लघू, मध्यम प्रकल्पांत सर्वांत कमी साठा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत ४८ टक्के तर ९८ लघू प्रकल्पांत केवळ ४७ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. जो इतर जिल्ह्यांतील प्रकल्पांमध्ये झालेल्या पाणी साठ्याच्या तुलनेत सर्वांत कमी आहे.

जालना जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांत ६० टक्के, ५७ लघू प्रकल्पांत ५७ टक्के, बीडमधील १६ मध्यम प्रकल्पांत ९९ टक्के तर १२६ लघू प्रकल्पांत ८० टक्के, लातूरमधील ८ मध्यम प्रकल्पांत ७८ टक्के तर १३५ लघू प्रकल्पांत ८७ टक्के, धाराशिवमधील १७ मध्यम प्रकल्पांत ७६ टक्के तर २०६ लघू प्रकल्पांत ६२ टक्के, नांदेडमधील ९ मध्यम प्रकल्पांत ९९ टक्के तर ८० लघू प्रकल्पांत ९८ टक्के, परभणीतील २२ लघू प्रकल्पांत ९१ टक्के तर दोन मध्यम प्रकल्पांत १०० टक्के व हिंगोलीतील २७ लघू प्रकल्पांत ९५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

४१ प्रकल्प तुडुंब मराठवाड्यातील एकूण ७५ माध्यम प्रकल्पांपैकी ४१ प्रकल्प तुडुंब झाले आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील १६ पैकी ५, बीडमधील १६ पैकी १४, लातूरमधील ८ पैकी ३, धाराशिवमधील १७ पैकी ९, नांदेडमधील ९ पैकी ८ व परभणीतील दोन्ही मध्यम प्रकल्पांचा समावेश असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT