Drone Spraying Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Drone : परतूर तालुक्यात पिकांवरील फवारणीसाठी ड्रोनचा वापर

ड्रोनद्वारे एका एकराची फवारणी करण्यासाठी सात ते आठ मिनिटांचा वेळ लागतो. ड्रोनद्वारे एका दिवसात वीस ते पंचवीस एकराची शेतीची फवारणी होऊ शकते.

Team Agrowon

Jalna News : तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी पिकांवर ड्रोनद्वारे फवारणी (Drone Spraying) करण्याला पसंती दिली आहे.

शेतकरी कमी श्रमात जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी सध्या शेती व्यवसायात (Agricultural business) अत्याधुनिक यंत्राच्या वापरावर भर दिला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून ड्रोन शेतीचा पर्याय समोर येत आहे. अत्याधुनिक शेती पद्धतीने शेतकऱ्यांचे कष्ट कमी होऊन कमी कालावधीत अधिकच उत्पन्न शक्य आहे.

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी ड्रोनच्या साह्याने शेतात फवारणी केली. त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ आणि पैसा दोन्हींमध्ये बचत होत आहे. आणि मजूरही लागत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.

ड्रोनद्वारे एका एकराची फवारणी करण्यासाठी सात ते आठ मिनिटांचा वेळ लागतो. ड्रोनद्वारे एका दिवसात वीस ते पंचवीस एकराची शेतीची फवारणी होऊ शकते.

ड्रोनद्वारे फवारणी केल्याने वेळेची बचत होते. वेळेवर फवारणी होते. अवघ्या सात ते दहा मिनिटांत एका एकराची फवारणी होते. शेतकऱ्यांना कालांतराने नव नवीन तंत्रज्ञान अवगत करणे गरजेचे आहे.
सखाराम पवळ, तालुका कृषी अधिकारी, परतूर
सध्या शेती कामासाठी मजूर मिळत नसल्याने मी एका एकरमध्ये ड्रोनद्वारे फवारणी केली, यात फक्त सात मिनीट लागले. यात एकूण खर्चही कमी लागला. या फवारणीमुळे पिके जोमात आहेत.
मधुकर भोकरे, शेतकरी, परतूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT