NPSS App Agrowon
ॲग्रो विशेष

NPSS App : कीड, रोगसाठी एनपीएसएस ॲपचा वापर करा

Crop Pest Survey : कृषी व किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकारव्दारे राष्ट्रीय कीड व रोग सर्वेक्षणात (एनपीएसएस) कापूस, मिरची, मका, भात व आंबा या पिकांच्या कीड-रोगाबाबत सर्वेक्षणासाठी प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

Team Agrowon

Nanded News : कृषी व किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकारव्दारे राष्ट्रीय कीड व रोग सर्वेक्षणात (एनपीएसएस) कापूस, मिरची, मका, भात व आंबा या पिकांच्या कीड-रोगाबाबत सर्वेक्षणासाठी प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

या प्रणालीमध्ये एनपीएसएस ॲप डाउनलोड करून शेतकऱ्यांनी स्वत: पिकावरील किडीची निरीक्षणे ॲपवर नोंदविल्यास त्यावरील उपाय योजना शेतकऱ्यांना मोबाइलवर तत्काळ उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी एनपीएसएस अॅपचा वापर करण्याचे आवाहन लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे अधीक्षक कृषी अधिकारी महेशकुमार तीर्थंकर यांनी केले आहे. या ॲपमध्ये विभागातील प्रमुख पिकांचा टप्प्याटप्प्याने समावेश होणार आहे.

शेतकऱ्यांना पिकांवरील किडीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी कमी खर्चात उत्तम नियंत्रण करण्यासाठी तत्काळ उपाययोजना ॲपच्या माध्यामातून सुचविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मोबाइलवरून गुगल प्ले स्टोअरमधून एनपीएसएस ॲप डाउनलोड करून या प्रणालीचा वापर करावा.

ही प्रणाली सध्या प्रायोगिक तत्त्वावर असून, प्रयोगशील शेतकऱ्यांनी प्रणालीचा वापर करून हे ॲप अधिक परिपूर्ण होण्यासाठी कृषी विभागास अभिप्राय द्यावेत. त्यामुळे या ॲपमध्ये आणखी सुधारणा करता येईल, असेही कळविण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Water Budgeting: समृद्ध गावशिवारासाठी पाण्याचा ताळेबंद

FPO Success Story: विविध उपक्रमांमधून ‘सातबारा’ कंपनीची आश्‍वासक वाटचाल

Post Harvest Management: काढणीपश्चात तंत्रज्ञानाची सद्यःस्थिती अन् आव्हाने

Spice Business Success: बीटेक पदवीधराचा ‘अष्टगुण मसाले’ ब्रॅंड

Mushrooms Health Benefits: पोषणमूल्ययुक्त आरोग्यदायी अळिंबी

SCROLL FOR NEXT