CM Devendra Fadnavis Agrowon
ॲग्रो विशेष

AI in Sugarcane Farming : ऊस उत्पादन, उत्पादकतेसाठी एआयचा वापर करा : देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis : साखर गळीत हंगामात ऊस क्षेत्र, ऊस उत्पादन आणि ऊस उत्पादकता याचा अचूक अंदाज येण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), रिमोट सेन्सिंग (आरएस) आणि जिओग्राफिक्स इन्फॉर्मेशन सिस्टीमचा (जीआयएस) वापर करावा.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : साखर गळीत हंगामात ऊस क्षेत्र, ऊस उत्पादन आणि ऊस उत्पादकता याचा अचूक अंदाज येण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), रिमोट सेन्सिंग (आरएस) आणि जिओग्राफिक्स इन्फॉर्मेशन सिस्टीमचा (जीआयएस) वापर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

सहकार विभागाच्या पुढील १०० दिवसांच्या कामकाजाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव संजय खंदारे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘राज्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. ‘एआय’ हे तंत्रज्ञान वापरात आल्याने शेतकऱ्यांबरोबरच साखर कारखान्यांसाठीही ते फायदेशीर ठरू शकते. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे गाळपासाठी उपलब्ध उसाचे योग्य नियोजन करणे सोपे होईल. साखर कारखान्यांना देण्यात आलेला मार्जिन मनी आणि साखर कारखान्यांमधील वजन काटे मॉनिटरिंगबाबतही सहकार विभागाने दक्ष राहावे.’

‘आदिवासी जिल्ह्यांत गोदाम उभारा’

जगातील सर्वांत मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत राज्यात १०० विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये जागेनुसार ३०० टन ते १००० टनांची गोदाम बांधण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या योजनेतून गडचिरोली, नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यातही गोदाम उभी करावीत. तसेच सहकारी गृह निर्माण संस्थांचे १०० टक्के डिजिटायझेशन करण्यावर भर द्यावा, अशी सूचना त्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT