Agriculture MSP Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture MSP : ‘एमएसपी’ वरून गदारोळ

MSP Issue : शेतीमालाला किमान हमी भाव (एमएसपी) देण्यासाठी कायदेशीर तरतूद करावी, या मागणीसाठी विरोधकांनी शुक्रवारी (ता. २६) राज्यसभेत गोंधळ घातला.

Team Agrowon

New Delhi News : शेतीमालाला किमान हमी भाव (एमएसपी) देण्यासाठी कायदेशीर तरतूद करावी, या मागणीसाठी विरोधकांनी शुक्रवारी (ता. २६) राज्यसभेत गोंधळ घातला. या गोंधळातच केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती प्रश्नोत्तराच्या तासात उत्तरात दिली.

समाजवादी पक्षाचे रामजीलाल सुमन यांनी मूळ प्रश्न विचारला होता. या वेळी त्यांनी एमएसपी ठरविण्यासाठी केंद्र सरकारने गठित केलेल्या समितीचा अहवाल आला आहे काय, अशी विचारणा केली. यावर केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या समितीचा अहवाल प्राप्त झालेला नसून समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सरकार त्यावर निर्णय घेईल, असे उत्तर दिले.

यानंतर खासदार रामजीलाल सुमन यांनी एमएसपीला घटनात्मक दर्जा मिळणार की, असा थेट प्रश्न विचारला. या प्रश्नाला काँग्रेसचे रणदीप सिंग सुरजेवाला, जयराम रमेश, रजनी पाटील, फुलोदेवी नेताम, दिग्विजय सिंह यांनी समर्थन दिले. यावर केंद्रीय मंत्र्यांनी उडवाउडवीचे उत्तर न देता थेट उत्तर द्यावे, असा आग्रह धरला.

या मागणीला तृणमूल काँग्रेस, द्रमुक, आप, बीजेडीच्या खासदारांनी पाठिंबा दिला. केंद्रीय मंत्री चौहान एमएसपीला घटनात्मक दर्जा देण्याबद्दल कोणतेही आश्वासन देण्यास तयार नसल्याने काँग्रेसच्या खासदारांनी ‘एमएसपी का कानून लाओ’, ‘किसान विरोधी मोदी सरकार व गरीब विरोधी मोदी सरकार’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.

सभापती जगदीप धनखड विरोधकांना शांतता राखण्याचे वारंवार आवाहन करीत होते. एमएसपीचा कायदा केव्हा करता, याचे उत्तर मंत्र्यांनी द्यावे, यासाठी सर्व विरोधक आग्रही होते. या गोंधळातच केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी, यूपीए सरकारने शेतीमालाला दिलेल्या भावापेक्षा गेल्या वर्षात मोदी सरकारच्या काळात शेतीमालाला अधिक भाव मिळाला आहे, असे सांगितले. विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ राजकारण करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT