Farmer Loan Waive  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waive : ‘कर्जमाफीपासून वंचितांची माहिती ३० नोव्हेंबरपूर्वी अपलोड करा’

Agriculture Loan Waive Scheme : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना पोर्टलवर ३० नोव्हेंबरपर्यंत माहिती अपलोड करण्यात यावी.

Team Agrowon

Akola News : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना पोर्टलवर ३० नोव्हेंबरपर्यंत माहिती अपलोड करण्यात यावी. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सहकार मंत्री तसेच कृषी मंत्र्यांनी जिल्हा उपनिबंधकामार्फत जिल्ह्यातील सर्व बँकांना सूचना दिलेल्या आहेत.

शेतकऱ्यांनी आपली माहिती पोर्टलवर ३० नोव्हेंबरपूर्वी अपलोड करावेत. यामुळे शेतकरी सवलतीपासून आपण वंचित राहणार नाहीत, असे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर यांनी केली आहे.

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची योजना सुरू केली होती. परंतु सरकार बदलल्यानंतर तीन वर्षे यावर महाविकास आघाडीच्या काळामध्ये काही करण्यात आले नाही. यासंदर्भात आ. सावरकर यांनी सहकाऱ्यांसह विधीमंडळात या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले होते.

लक्षवेधी तसेच विविध तारंकित प्रश्न तसेच सरकारकडे पाठपुरावा करून कर्जमाफी नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा, त्यांना प्रोत्साहन रक्कम देण्यात यावी अशी मागणी केली होती. अकोला जिल्ह्यात या शेतकऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर असून त्यांना या योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी केली.

मागणीची सरकारने दखल घेतली असून ३० नोव्हेंबर पर्यंत या पोर्टल माहिती शेतकऱ्यांनी भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार संजय धोत्रे, आ. रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे, हरीश पिंपळे, वसंत खंडेलवाल यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ramlila Maidan Farmer Protest : दिल्लीच्या रामलीला मैदानावर हजारो शेतकरी एकत्र जमले; केंद्र सरकारकडे हमीभाव कायदा, कर्जमाफीची मागणी

Farmer ID Scam: बनावट फार्मर आयडी, जमीन एकाची, अनुदान दुसऱ्याला, नेमका घोळ काय?

Kolhapur ZP President: कोल्हापूर ‘झेडपी’च्या अध्यक्षपदी शिल्पा खोत यांची बिनविरोध निवड

Water Scarcity: वर्ध्यावर पाणीटंचाईचे सावट

Unseasonal Rain Damage: शिरोळ तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT