Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain Crop Loss : अवकाळी पावसाने रब्बी पिकांची हानी; तात्काळ पंचनाम्याची मागणी

Crop Damage : आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना बुधवारी (ता. २) चक्रीवादळ, अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानाने पुन्हा एकदा जबर फटका दिला आहे.

Team Agrowon

Buldana News : आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना बुधवारी (ता. २) चक्रीवादळ, अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानाने पुन्हा एकदा जबर फटका दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रब्बी पिके, भाजीपाला तसेच फळबागांच्या नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करावे. शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटांनी घेरला आहे. गेल्या खरीप हंगामात पावसात खंड पडल्याने उत्पादनात मोठी घट आली होती. जो काही शेतीमाल शेतकऱ्यांच्या हातात आला त्या मालाला भाव नसल्याने लागवडीचा खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगामात आपल्या पदरी काही पडेल अशी आशा शेतकऱ्यांना होती.

परंतु निसर्गाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर सूड उगवला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळीवारा, चक्रीवादळ यामुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, मका तसेच भाजीपाला आणि फळबागांचे प्रचंड असे नुकसान झाले आहे.

उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. तर फळबागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे ज्वारी, मका, गहू व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पाऊस चक्रीवादळ आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामांकडून असलेल्या अपेक्षांवर पाणी फेरले.

शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे. अशावेळी शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस चक्रीवादळ व ढगाळ वातावरणामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्त्वे नुकसान भरपाई द्यावी. या मागणीचे निवेदन गुरुवारी (ता. ३) जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Surya Ghar Yojana: सौरऊर्जेतून घरगुती, कृषीला शाश्‍वत वीजपुरवठा

Solar Agriculture Pump: सौरपंपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी रखडपट्टीच

Crop Loan: कर्ज पुनर्गठनाची अंमलबजावणी रखडली

Tomato Late Blight: टोमॅटो पिकावरील उशिराने येणारा करपा नियंत्रणाचे सोपे उपाय

Nanded Degloor Expressway: नांदेड–देगलूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मिळणार गती

SCROLL FOR NEXT