Unseasonal Rains Khandesh agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rains Khandesh : खानदेशात अवकाळी पावसाने केळी, गहू, हरभरा, मका पिकांना मोठा फटका; पावसाची शक्यता कायम

Rain Damage Banana : पावसामुळे केळी, गहू, हरभरा, मका, यासह अन्य पिकांनाही मोठा फटका बसला. गैरहंगामी होत असलेल्या पावसाने पिकांवर रोगराईचे संकट येण्याची भिती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

sandeep Shirguppe

Unseasonal Rain Damage Crop : खानदेशातील तीन जिल्ह्यांना शुक्रवारी (ता.२७) अवकाळी पावसाचा तडाखा बसला. जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीट झाली. तर काही ठिकाणी जोरदार पावसाने शेतातील बांध फुटून पाणी शेताबाहेर आले. या पावसामुळे केळी, गहू, हरभरा, मका, यासह अन्य पिकांनाही मोठा फटका बसला. गैरहंगामी होत असलेल्या पावसाने पिकांवर रोगराईचे संकट येण्याची भिती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

धुळे जिल्ह्यात शिरपूर, पिंपळनेर यासह नंदुरबार, शहादा तालुक्यांत पाऊस झाला. रावेर शहरासह तालुक्यात (ता.२७) संध्याकाळी साडेचारच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रावेर विवरा, भाटखेडा, उटखेडा, पातोंडी, विटवा, अजंदे यासह मुसळधार पाऊस झाला. रावेर शहरासह काही भागात गारपीट झाली.

धुळे जिल्ह्यात वादळी पाऊस

धुळे जिल्ह्यातील काही भागात शुक्रवारी सायंकाळी पाऊस झाला. शिरपूर शहर आणि परिसरात सायंकाळी वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अर्धा तास पावसाने परिसराला झोडपून काढले. पिंपळनेरसह परिसरात आज सायंकाळी पाच ते साडेपाच दरम्यान ढगाळ वातावरण होऊन अचानक पावसाला सुरवात झाली. शेती पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

नंदुरबार परिसरात शुक्रवार (ता.२७) साडेचारच्या सुमारास पाऊस झाला. शहरात तुरळक सरी कोसळल्या तर लगतच्या ग्रामीण भागात जोरदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे कापूस व मिरची उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी तुरळक तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या.

राज्यात वादळी पावसाचा इशारा

राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून, किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब झाली आहे. शनिवार (ता. २८) राज्यात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

दक्षिण केरळ लगतच्या अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे. शुक्रवारी (ता. २७) राजस्थानच्या 'चुरू' येथे देशाच्या सपाट भूभागावर नीचांकी ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT