Unseasonal Rain in Vidarbha Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : गोंदियाला अवकाळी पावसानं झोडपलं, धान पिकांना फायदा ?

Gondia Rain : गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने झोडपून काढले आहे. मात्र गोंदियात बुधवारी (ता.०६) झालेल्या अवकाळीमुळे जिल्ह्यातील धान पिकांना फायदा होणार आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस, वादळे वारे आणि गारपिटीने झोडपले होते. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. यादरम्यान सोमवारी (ता.०४) पुन्हा एकदा विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने नागपूरसह, गोंदिया, अमरावती आणि अकोला जिल्ह्यास अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. बुधवारी (ता.०६) गोंदिया जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली. यामुळे धान पिकांना याचा फायदा झाल्याचे बोलले जात असून शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. 

गोंदिया जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामातील धान पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान राज्यातील झालेल्या अवकाळी पावसानंतर अचानक हवामान बदलले असून कडक उन्हाच्या तडाका जिल्ह्यात जाणवत आहे. यातच कडक ऊन आणि अपुऱ्या विद्युत पुरवठ्या अभावी अनेक शेतकऱ्यांचे धानपिक करपत चालले आहे. यामुळे शेतकरी चिंतारूर असतानाच जिल्ह्यात सुमारे अर्धा तास दमदार पाऊस झाल्याने धान पिकांना फायदा होणार आहे.

दरम्यान गेल्या वर्षीच्या शेवटच्या दोन महिन्यासह यंदा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात देखील विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे येथे शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. तर जानेवारी महिन्यातील ढगाळ वातावरण आणि थंडीची लाटेचा थेट परिणाम हा जिल्ह्यातील शेतपिकांवर झाला होता.

तर  ऐन रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे हरभरा आणि तूर पिकाचे नुकसान झाले होते. यानंतर आता अपुऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान अवकाळी पाऊस झाल्याने पिकांना पाणी मिळाले आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT