Unseasonal Rain Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain Kolhapur : कोल्हापुरात ६ तालुक्यांना अवकाळी पावसाने झोडपले; नाचणी, ऊस, जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान

Kolhapur Weather Update : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या दोन दिवसात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पन्हाळगड व परिसराला शुक्रवारी (ता.०७) रात्री तासभर पावसाने अक्षरशः झोडपून काढले.

sandeep Shirguppe

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या दोन दिवसात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पन्हाळगड व परिसराला शुक्रवारी (ता.०७) रात्री तासभर पावसाने अक्षरशः झोडपून काढले. यावेळी पडलेल्या पावसाची वीस मिलिमीटर इतकी नोंद झाली. दरम्यान होणाऱ्या पावसाने ऊस आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते, दोन दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊसही पडला. शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास अचानक पन्हाळा, शिरोळ, हातकणंगले, शाहुवाडी, चंदगड, करवीर तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. साडेसात ते साडेआठ या एक तासात पावसाने झोडपून काढले. त्यानंतर उशिरापर्यंत हलक्या प्रमाणात ढगांच्या गडागडाटासह पाऊस सुरू होता.

जोतिबा डोंगर परिसरात जोरदार पाऊस

जोतिबा डोंगर येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने भाविकांसह दुकानदार-व्यापारी यांची त्रेधातिरपीट उडाली. भाविकांना चिंब भिजून परतावे लागले. मंदिर परिसरात पावसाचे पाणी साठले. व्यापारी मेन पेठेत पावसाने काही ठिकाणी प्रसादाचे साहित्य भिजले. येथे गेले दोन दिवस तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. मात्र, शुक्रवारी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला.

चंदगड तालुक्यात मुसळधार पाऊस

कानूर खुर्द (ता. चंदगड) परिसरात शुक्रवारी (ता.०६) सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. दिवसभर आभाळाचे वातावरण होते. सायंकाळी अचानक सुमारे अर्धा तास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. काही शेतकऱ्यांचे कापून टाकलेले गवत या पावसाने भिजले. दरम्यान, बदललेल्या वातावरणाचा शेतीकामांवर परिणाम झाला आहे. गेले चार दिवस पावसाळी वातावरण असल्यामुळे भात, नाचणा कापणी, मळणीची कामे थांबली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drinking Water Management: टंचाईग्रस्त भागातही पाणी पोहोचविणार : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Farmers Protest: पीकविम्यासाठी शेतकरी संघटनेचा चाबूक आपटत ‘ठिय्या’

Illegal Organic Fertilizer: वेंगुर्ल्यात विनापरवाना सेंद्रिय खतावर भरारी पथकाची कारवाई

Farm Loan Waiver: कर्जमुक्तीसाठी कोणते शेतकरी पात्र?; पुनर्गठित कर्जाबाबतही महत्त्वाचा निर्णय

Tembhu Irrigation Scheme: ‘टेंभूचे उन्हाळी आवर्तन बंद; ६० ठिकाणचे शेतकरी पाण्याविना

SCROLL FOR NEXT