Mango Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे हापूस डागाळण्याची भीती

Alphonso Mango Damage : चिपळूणपाठोपाठ रत्नागिरी, राजापूर आणि दापोलीत मंगळवारी (ता. १) रात्री पावसाने हजेरी लावली आहे. त्याचा परिणाम आंबा पिकावर होणार आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : चिपळूणपाठोपाठ रत्नागिरी, राजापूर आणि दापोलीत मंगळवारी (ता. १) रात्री पावसाने हजेरी लावली आहे. त्याचा परिणाम आंबा पिकावर होणार आहे. बदलत्या हवामानामुळे हापूसच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. मे आणि जून महिन्यात तयार होणारा आंबा अवकाळी पावसामुळे डागळण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक आंबा बागायतदार चिंतेत आहेत.

अवकाळी पावसाचे सावट अजूनही कायम आहे. सोमवारी (ता. ३१) रात्री काही ठिकाणी तुरळक पावसाच्या हलक्या सरी पडल्या. मंगळवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. यामुळे उष्णतेमध्येही कमालीची वाढ झाली आहे. कोकणातील काही तालुक्यांमध्ये हापूस आंबा तयार झाला आहे तो विक्रीसाठी मोठ्या शहरांमध्ये पाठवण्यात आला आहे; मात्र चिपळूण तालुक्यातील हापूस आंबा अजून तयार झालेला नाही.

चिपळूण तालुका सह्याद्रीच्या कुशीत समुद्रापासून लांब असल्यामुळे येथील आंबा मे आणि जूनमध्ये तयार होतो. येथील बाजारपेठेत देवगडचा हापूस आंबा विक्रीसाठी उपलब्ध आहे. रत्नागिरी, दापोली, गुहागर येथून काही विक्रेत्यांनी हापूस आंबा विक्रीसाठी आणला आहे.

चिपळूणमधील बागायतदारांचा आंबा मे अखेर तयार होतो. तालुक्यात ६४ शेतकऱ्यांनी आंब्याचे उत्पादन घेतले आहे. या आंब्यावर अवकाळी पाऊस पडल्याने तो खराब होण्याचा जास्त धोका आहे. थंडीच्या हंगामात चांगला मोहोर आला होता; मात्र किडींचा प्रादुर्भाव आणि कडक उन्हामुळे मोहोर करपला.

अवकाळी पावसामुळे स्थानिकांचा आंबा टिकाव लागण्याची शक्यता कमी आहे. मे महिन्यात आंब्याचे दर उतरतात. त्यामुळे स्थानिक बागायतदारांना चांगला दर मिळत नाही. मिळणाऱ्या पैशातून खर्चही बाहेर निघत नाही. त्यातच आता अवकाळी पावसामुळे आंबा खराब होण्याचा धोका अधिक आहे.

‘सरकारने नुकसान भरपाई द्यावी’

पेढांबे येथील आंबा बागायतदार म्हणाले, की गतवर्षी मेपासून स्थानिक आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली होती. यावर्षी खराब हवामानामुळे उत्पादन कमी होण्याचा धोका आहे. आम्हाला खर्चही काढणे शक्य होणार नाही. त्यामुळे सरकारने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: २०२६–२७ अर्थसंकल्पात तरुणांसाठी शिक्षण, रोजगार आणि क्रीडा क्षेत्रात मोठ्या घोषणा

Agricultural Machinery Subsidy: मिनी ट्रॅक्टर, उपसाधने पुरवठा योजनेसाठी अर्ज करा

SevaKarmi Plus: ‘सेवाकर्मी प्लस’ अभियानात ‘शबरी महामंडळ’ प्रथम

Rural Life: गोष्ट एका मायाळू जिवाची

Natural Farming Mission: नैसर्गिक शेती अभियानांतर्गत ५४ शेतकरी गट स्थापन

SCROLL FOR NEXT