Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Palghar Crop Loss : डहाणू तालुक्यात ४७० हेक्टरला फटका

Unseasonal Rain Crop Damage : पालघर जिल्ह्यामध्ये दोन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे डहाणूतील शेतकऱ्यांच्या फळबागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या आहेत.

Team Agrowon

Palghar News : पालघर जिल्ह्यामध्ये दोन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे डहाणूतील शेतकऱ्यांच्या फळबागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या आहेत. उन्हाळी हंगामात पाट-पाण्याच्या आधारावर भातशेती केली जाते. जिल्ह्यात मिरचीसह, भाजीपाला, अनेक पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे.

ऐन हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकरी, आंबा बागायतदार, चिकू उत्पादक शेतकऱ्यांसह अनेक केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. डहाणूत एकूण ४७० हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे.

डहाणू तालुक्यात अंदाजे आकडेवारीनुसार १५० हेक्टरवर आंबा फळबागा, २५० हेक्टरवर चिकू बागा, ७०.५० हेक्टरवर उन्हाळी भातशेतीचे नुकसान झाले आहे. आंबा, चिकूनंतर केळीतूनही अधिक उत्पादन मिळते.

डहाणू तालुक्यात केळीचे घड परिपक्व अवस्थेत असताना अचानक अवकाळीने घात केला. केळी अक्षरश: मुळासकट उन्मळून पडल्या आहेत. त्यामुळे डहाणू तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी आणि बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

उन्हाळी भातशेती शेतातच आडवी झाली आहे. डहाणूतील आंबा उत्पादकांच्या आंब्याची झाडे उन्मळून पडली आहेत, तर तयार झालेला आंबा गळून पडला आहे. उन्हाळ्यात तहान भागवणारी आणि आदिवासींना रोजगार उपलब्ध करून देणारी जामची फळेही वादळी वाऱ्याने गळून पडली आहेत. मिरची उत्पादक शेतकऱ्यांचे शेडनेट देखील वादळी वाऱ्याने अस्ताव्यस्त केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या १७ पैकी ११ जागांसाठी मतदान सुरु, कोण, कुठे रिंगणात? महायुतीचे ६ उमेदवार बिनविरोध

Bovine Breeding Act: गोजातीय प्रजनन अधिनियमाची अंमलबजावणी सुरू

Beed Water Crisis: पाणीबाणीचे सावट; १४ प्रकल्प कोरडेठाक

Dodka Production: दोडका उत्पादनात एकरी तीन ते सहा टन वाढ

Climate Change : आशिया देशांना २०२५ मध्ये हवामान संकटाचा मोठा फटका; उष्णतेच्या लाटा, पूर आणि दुष्काळामुळे वाढले नुकसान

SCROLL FOR NEXT