Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : नगरसह नेवासा, पारनेर, शेवगावमध्ये वादळी पाऊस

Crop Damage : गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा धडाका सुरू आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी पाऊस झाला.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरूच आहे. शुक्रवारी (ता. २६) रात्री नगर, पारनेर शेवगाव, नेवासा तालुक्यांतील अनेक भागांत जोरदार वादळी पाऊस झाला.

त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. महिनाभरात जिल्ह्यात अवकाळी पावसाने जवळपास सव्वाशे हेक्टरवर पिके, फळबागांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका फळपिकांना बसला आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा धडाका सुरू आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी पाऊस झाला. नगर शहर आणि परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी झाले.

प्रशासनाकडे झालेल्या नोंदीनुसार ब्राह्मणी, घोडेगाव, कुकाणा, नेवासा, करंजी, मिरी, एरंडगाव, शेवगाव, निघोज, पारनेर, चास, रुईछत्तीशी, भिंगार, कापूरवाडी, कोडगाव, नालेगाव सावेडी आदी महसूल मंडलांत पाऊस नोंद झाली.

गेल्या महिनाभरापासून अधून-मधून सातत्याने अवकाळी पाऊस व वादळी वारा सुरू आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. अनेक भागात सध्या कांद्याची काढणी सुरू आहे. त्यासह उन्हाळी पिके, आंबा, डाळिंब, लिंबू, केळी पिके, भाजीपाल्याला फटका बसत आहे. बसला. विजा पडून जीवितहानीही होत आहे.

वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडणे, झाडे, विजेची खांब पडणे, फळांची गळती यामुळे मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिनाभरात २० पेक्षा अधिक गावांत सव्वाशे हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. दोनशेवर जवळपास शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT