Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा धुमाकूळ

Crop Damage : गेल्या दोन दिवसांपासून या भागात अवकाळी पाऊस सक्रिय झाला आहे. वादळ व गारपिटीने पिके जमीनदोस्त झाली आहेत.

 गोपाल हागे

Akola News : गेल्या दोन दिवसांपासून या भागात अवकाळी पाऊस सक्रिय झाला आहे. वादळ व गारपिटीने पिके जमीनदोस्त झाली आहेत. मंगळवारनंतर बुधवारी (ता.१०) सायंकाळी जिल्ह्यात वादळ व पावसाने धुमाकूळ घातला. याचा मोठा फटका लिंबू बागा, आंब्याला बसला. अनेकांच्या बागा उन्मळून पडल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडला आहे.

पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांत सलग दोन दिवस अवकाळी पावसाने हजेरी दिली. पावसासह जोरदार वारा वाहिल्याने नुकसान अधिक झाले. मंगळवारच्या आपत्तीत अकोला जिल्ह्यात ४०६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यात सर्वाधिक पातूर तालुक्यात २४ गावात २८६६ हेक्टरवर नुकसान झाले.

तेल्हारा तालुक्यात हजार, बाळापूर २५० हेक्टरचे नुकसान झाले आहे. कांदा, ज्वारी, भाजीपाला, आंबा, लिंबू, पपई, केळी, गहू, टरबूज-खरबूज अशा विविध पिकांचे हे नुकसान झाले आहे. त्यानंतर बुधवारी पुन्हा सायंकाळी झालेल्या पावसाने मोठी हानी केली. सर्वाधिक तडाखा पातूर तालुक्याला पुन्हा बसला. या तालुक्यात सुमारे २० ते २५ गावात नुकसान झाले आहे. यंत्रणांकडून आढावा घेणे सुरू आहे.

बुधवारी वादळाने लिंबू बागांमध्ये धुमाकूळ घातला. या तालुक्यात विवरा, बेलुरा व परिसरात असलेल्या अनेकांच्या लिंबू बागा उखडून गेल्या आहेत. सध्या लिंबाचा हस्त बहर सुरू होता. लिंबूला दरही चांगला मिळत होता.

अशातच ही आपत्ती ओढवल्याने प्रत्येक भागधारकाचे लाखोंचे नुकसान झाले. पातूरसह तेल्हारा, अकोट तालुक्यांत वादळी पाऊस गारपिटीने, उन्हाळी ज्वारी, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. विजेचे खांब, तारा तुटून पडल्या.

दहा वर्षांपूर्वी तीन एकरांत लिंबूची लागवड केली होती. वादळी पावसाने तीन एकरांतील ३५० झाडांपैकी फक्त २५ ते ३० झाडे उभी राहिली आहेत. इतर सर्व झाडे उन्मळून पडली. गावातील इतरही शेतकऱ्यांच्या बागा उखडल्या. गावात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने सर्वेक्षण करून मदत द्यावी.
- हरीश धोत्रे, लिंबू उत्पादक, विवरा, जि. अकोला.
पातूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या नैसर्गिक आपत्तीचा ४० ते ४५ गावांना फटका बसला आहे. यामध्ये लिंबू, आंबा या फळपिकांसह कांदा बीजोत्पादन, भाजीपाला, ज्वारी व इतर पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचा आढावा घेणे सुरू आहे.
- धनंजय शेटे, तालुका कृषी अधिकारी, पातूर, जि. अकोला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT