Agriculture Technology  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Technology : तंत्रज्ञान थेट शेतात: शेतकऱ्यांसाठी प्रायोगिक शेतीचा नवा मार्ग

Transforming Agriculture : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, खामगाव (ता. गेवराई) येथे गुरुवारी (ता. २०) वैज्ञानिक सल्लागार समिती बैठक आयोजित करण्यात आली होती

Team Agrowon

Beed News : कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञाने विद्यापीठाचे व कृषीच्या इतर प्रगत तंत्रज्ञान बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतावर प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधावा, अशी सूचना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू प्रा. डॉ. इंद्र मणी यांनी केली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, खामगाव (ता. गेवराई) येथे गुरुवारी (ता. २०) वैज्ञानिक सल्लागार समिती बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. इंद्र मणी ऑनलाइन मार्गदर्शन करीत होते. संचालक विस्तार शिक्षण डॉ. गिरिधारी वाघमारे, अटारी पुणे येथील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. शाकीर अली, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.

बैठकीस विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी, दिघोळआंबा केव्हीके प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत देशमुख, तालुका कृषी अधिकारी कु. आश्‍विनी म्हस्के, सोबतच वैज्ञानिक सल्लागार समिती बैठकीचे सदस्य प्रगतिशील शेतकरी सखाराम कानगुडे, मुरलीधर घोडके, अर्जुन फलके, रामेश्‍वर चांडक यांची उपस्थिती होती.

कार्यक्रम समन्वयक डॉ. हनुमान गरुड यांनी प्रास्ताविकातून केव्हीकेच्या मागील दोन वर्षांच्या केलेल्या विविध विस्तार कार्याच्या अहवालाचे सादरीकरण केले. पशुसंवर्धन विभागामार्फत शेतीस जोडधंदा- आधुनिक शेळी व कुक्कुटपालन या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर केव्हीकेच्या सर्वच विषय विशेषज्ञांनी विषयनिहाय आपल्या कार्याचा अहवाल सादर केला.

डॉ. वाघमारे म्हणाले, की कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व जिल्ह्यातील सर्वच कृषी संलग्नित संस्था शेतकरी हा केंद्रस्थानी ठेवून विस्तार कार्य करावे. केव्हीकेद्वारे घेण्यात आलेल्या विविध चाचण्यांचे निष्कर्ष इतर शेतकरी बांधवांना सांगावेत व तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात प्रोत्साहित करावे. डॉ. अली यांनी ऑनलाइन माध्यमातून आपले मनोगत व्यक्त केले.

या वेळी उपस्थित प्रगतशील शेतकरी, महाबीज बीड प्रतिनिधी, धानचे जिल्हा समन्वयक नितीन खडके, रिलायन्स फौंडेशन, ॲग्रोवन प्रतिनिधी, पाणी फौंडेशन, कृषी विभागातील अधिकारी व कृषी उद्योजकांनी प्रत्याभरणे दिली व त्यानुसार सर्व विभागांनी कार्य करावे, असे मत व्यक्त केले.

सूत्रसंचालन डॉ. भैयासाहेब गायकवाड यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. तुकेश सुरपाम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. किशोर जगताप, गजेंद्र आढावे, दत्तप्रसाद वीर, विजय चांदणे, सुधाकर काटे, उमेश वारे आणि केव्हीकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manoj Jarange Patil: १५ सप्टेंबरला अंतरवाली सोडणार, चार मुक्काम करत पाचव्या दिवशी मुंबईत धडकणार, मनोज जरांगेंची घोषणा

Pending Water Charges: ताकारीचे पाणी पाहिजे, आधी थकीत पाणीपट्टी भरा

MPSC Paper Leak : ‘एमपीएससी’ पेपरफुटीची सखोल चौकशी करा

Farmer Demands: मुक्ताईनगर तालुक्यात दुष्काळ जाहीर करा

Land Revenue Code: भडगाव तहसीलदारांचा पाय खोलात

SCROLL FOR NEXT