Onion Seed Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Seed : विद्यापीठाचे कांदा बियाणे नगर, नाशिकसह साताऱ्यात उपलब्ध

Mahatma Phule Agriculture University : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या कांद्याच्या ‘फुले समर्थ’ या वाणाला शेतकऱ्यांकडून दरवर्षी मोठी मागणी असते.

Team Agrowon

Nagar News : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या कांद्याच्या ‘फुले समर्थ’ या वाणाला शेतकऱ्यांकडून दरवर्षी मोठी मागणी असते. मात्र बियाणे खरेदीसाठी कृषी विद्यापीठाच्या खरेदी केंद्रावर यावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आता त्या त्या जिल्ह्यात कांदा बियाणे पुरविले जाणार आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आता अधिक कांदा उत्पादक शेतकरी असलेल्या नाशिक, नगर व सातारा जिल्ह्यांतील कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रांवर ‘फुले समर्थ’ या वाणाचे कांदा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध केले आहे.

तसेच निफाड (जि. नाशिक)येथील कृषी संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) येथील कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र, चास (जि. नगर) येथील कृषी संशोधन केंद्र, व बोरगावातील (जि. सातारा) कृषी संशोधन केंद्रात हे कांदा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

दरम्यान, त्याचप्रमाणे विद्यापीठाने संशोधन केलेल्या सोयाबीनच्या विविध वाणांनासुद्धा शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्या दृष्टीने विद्यापीठाने ‘फुले संगम’ (केडीएस ७२६) या वाणाचे प्रमाणित बियाणे आजपासून (ता. २२) विद्यापीठात विक्रीसाठी उपलब्ध असेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची रक्कम येत्या दोन दिवसांत; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Political Debate: घाबरलेल्या मोदी-शहांकडून संसदेचा अपमान : खर्गे

Kharif Sowing Deficit: देशभरात खरीप पेरणीतील तूट तीन टक्क्यांखाली

Onion Procurement Controversy: परराज्यांतील निकृष्ट कांद्यामुळे खळबळ

Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT