Shivraj Singh Chauhan Agrowon
ॲग्रो विशेष

Shivraj Singh Chauhan : राज्यातील ग्रामीण भागातील ११७ रस्त्यांसाठी ६५५ कोटींचा निधी; केरळसह मध्य प्रदेशमधील ग्रामीण रस्त्यांनाही मंजूर

Pradhan Mantri Gram Sadak Yojana : महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेशमधील ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील विविध जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रस्त्यांची दुरावस्था झाली असून काही ठिकाणी अद्याप रस्त्याच नाही. अशा ठिकाण प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत नव्या रस्त्यांची निर्मिती केली जाणार असून ६५५ कोटींचा निधी दिल्याची माहिती केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. तसेच केरळसह मध्य प्रदेशमधील ग्रामीण रस्त्यांनाही मंजुरी देण्यात आली आहे.

राज्यासाठी ६५५.६६ कोटींचा निधी

राज्यातील विविध जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक रस्ते खराब झाले आहेत. तर काही ठिकाणी रस्तेच नाहीत. त्यामुळे ग्रामीण विकासावर परिणाम झाला आहे. गावे, वाड्यांना जोडणारे रस्‍ते तयार करून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत नवे रस्ते केले जाणार आहेत. राज्यात नव्या ७४५ किमी. च्या ११७ रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. तर यासाठी ६५५.६६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या नव्या रस्त्यांमुळे राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत होण्यास मदत मिळणार आहे.

मध्य प्रदेशात नवे ६० रस्ते

मध्य प्रदेशातही प्रधानमंत्री ग्राम सडक योजनातंर्गत ११३.५८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर येथे १५२.४४ किमी लांबीचे ६० रस्ते होणार आहे.

केरळमध्ये ११ पूल

केरळ राज्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-३ अंतर्गत ११ पुलांच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी ५५.२८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

ग्राम सडक योजना - ४ नेसाठी ७० हजार १२५ कोटी

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (ता.११) प्रधानमंत्री ग्राम सडक योजना - ४ च्या प्रस्तावाला मंजुरी दिली. जी आर्थिक वर्ष २०२४-२५ ते २०२८-२९ या काळासाठी असेल. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना - ४ नव्या ६२ हजार ५०० किमी लांबीचे रस्ते बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे. या योजनेचा एकूण खर्च ७० हजार १२५ कोटी रुपये असेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT