Nano Urea Plus Agrowon
ॲग्रो विशेष

Nano Urea Plus : कृषी मंत्रालयाने आणले शेतकऱ्यांसाठी नॅनो युरियाचे नवे व्हर्जन

Nano Urea Plus (liquid) : केंद्रीय कृषी मंत्रालयाने इफ्कोच्या मदतीने नॅनो युरियात बदल करण्याचे संकेत दिले होते. याप्रमाणे मंत्रालयाने नॅनो युरियाचे नवे व्हर्जन आणले असून याचे उत्पादन पुढील आठवड्यापासून सुरू होऊ शकते.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : देशातील युरियाची मागणी वाढत आहे. यामुळे देशाला युरियाच्या उत्पादनात स्वयंपुर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा दावा केंद्र सरकारने अनेक वेळा केला आहे. यादरम्यान कृषी मंत्रालयाने इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (इफ्को) च्या नॅनो युरिया प्लसला तीन वर्षांसाठी मान्यता दिली आहे. याचे उत्पादन पुढील आठवड्यापासून सुरू होऊ शकते. याबाबत सरकारने १६ एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली आहे.

याआधी इफ्कोच्या नॅनो युरियाच्या परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित केले जात होते. अशा स्थितीत आता सरकारने नॅनो युरियाचे नवे व्हर्जनला मान्यता दिली आहे. जे आता नॅनो युरिया प्लस असेल. यामुळे पिकांच्या वाढीसाठी नायट्रोजनची वाढीव मात्रा उत्तम आणि पोषण ठरेल असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.

प्रगत आणि नवे व्हर्जन

नॅनो यूरिया प्लस हे इफकोच्या नॅनो युरियाचे प्रगत आणि नवे व्हर्जन आहे. इफ्कोने जून २०२१ मध्ये जगातील पहिले 'नॅनो लिक्विड युरिया' खत लाँच केले होते. त्यानंतर एप्रिल २०२३ मध्ये 'नॅनो डीएपी' खत आणले होते. तर इफ्कोने आतापर्यंत ६ कोटी ५०० मिली नॅनो युरियाच्या बाटल्या शेतकऱ्यांना दिल्या. नॅनो यूरियात १-५ टक्के नायट्रोजन आहे. पण नॅनो युरिया प्लसमध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त आहे.

नॅनो युरियाची सुधारित आवृत्ती

नॅनो यूरिया प्लसच्या अधिसूचनेनंतर इफकोचे एमडी आणि सीईओ डॉ. यू.एस. अवस्थी म्हणाले, "मला कळवण्यास आनंद होत आहे की, नॅनो युरिया प्लस (लिक्विड) हे तीन वर्षांच्या कालावधीसाठी सरकारने अधिसूचित केले आहे. राजपत्रातील अधिसूचनेनुसार, १६ टक्के नायट्रोजन सामग्री आणि ४-८.५ पीएच मूल्य आणि ५-३० च्या गुणांकासह मान्यता दिली आहे".

उत्पन्न वाढेल

तसेच "मातीचे आरोग्य, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी पारंपरिक युरिया आणि इतर नायट्रोजन खतांना पर्याय म्हणून नॅनो युरिया प्लसचा वापर होऊ शकतो. नॅनो युरिया प्लस सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि कार्यक्षमता देखील वाढवते. तसेच शेतकऱ्यांचा नफा वाढवण्यास आणि शाश्वत वातावरणाला प्रोत्साहन देण्यास देखील मदत करेल", असेही अवस्थी म्हणाले.

नॅनो-युरियाची किंमत आणि नॅनो-डीएपीची किंमत

२६ एप्रिल २०२३ रोजी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शहा यांनी नवी दिल्लीत इफ्कोचे नॅनो डिपीए (लिक्विड) लाँच केले होते. तसेच शहा यांनी, शेतकऱ्यांना दाणेदार युरियाऐवजी लिक्विड नॅनो युरिया आणि डीएपी वापरण्यास प्रोत्साहित केले होते.

यावेळी नॅनो-युरियाची किंमत २२५ रुपये असून नॅनो-डीएपीची किंमत ६०० रुपये प्रति ५०० मिली बॉटल आहे. तर दाणेदार युरियाची किंमत २६६.५० रुपये प्रति ५० किलो बॅगची आहे. आणि डीएपीची किंमत १३५० रुपये प्रति ५० किलो बॅग आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT