Umred APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Umred APMC : उमरेड बाजार समिती राज्यात सातव्या स्थानी

APMC Ranking : उमरेड बाजार समितीने शेतीमाल साठवणुकीकरिता नवीन गोदामे तयार केले असून, पावसाळ्यामध्ये शेतीमाल खरेदी विक्रीचे व्यवहार सुरळीत राहावे याकरिता प्रोफ्लेक्सचे डोम तयार करण्याचे कामास सुरुवात केलेली आहे

Team Agrowon

Nagpur News : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या वर्ष २०२३-२४ मधील कामगिरीच्या आधारावर पण संचालनालय, पुणे यांच्याकडून मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत वार्षिक क्रमवारी (रेकिंग) जाहीर झालेली आहे.

यामध्ये उमरेड बाजार समितीने सलग तिसऱ्यांदा राज्यातील ३०५ बाजार समित्यांमधून ७ वा क्रमांक, तर नागपूर महसूल विभागामधून दुसरा व नागपूर जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकाविला आहे.

पण संचालनालयाने जाहीर केलेल्या क्रमवारीमध्ये बाजार समित्यांचे आर्थिक व्यवस्थापन, कार्यालयीन कामकाज, शेतकऱ्यांसाठी पुरविलेल्या सोईसुविधा इत्यादी घटकांचा विचार करण्यात आला. या निकषांच्या आधारावर २०० गुणांचे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये उमरेड बाजार समितीला १५२.५ गुण प्राप्त झालेले आहे. या क्रमावारीमध्ये राज्यातील बाजार समित्यांनी खासगी बाजार, थेट परवाने, नियमन मुक्ती इत्यादी अनेक अडचणींवर मात करत चांगली कामगिरी केलेली आहे.

खासगी बाजारांची वाढती स्पर्धा लक्षात घेता उमरेड बाजार समितीने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा पुरवणे, शेतीमालाचे पारदर्शक व्यवहार, नगदी चुकारे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीला व चोरीला आळा घालणे इत्यादी सुधारणेवर भर दिलेला आहे. उमरेड बाजार समितीमध्ये बाजार भावाकरीता एसएमएस सुविधा, डिजिटल डिस्प्ले बोर्ड, सीसीटीव्ही कॅमेरे इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे.

या क्रमवारीमुळे शेतकऱ्यांना केंद्रस्थानी मानून अधिकाधिक चांगल्या सुविधा देणाऱ्या बाजार समित्यांचे मनोबल वाढलेले आहे. उमरेड बाजार समितीने शेतीमाल साठवणुकीकरिता नवीन गोदामे तयार केले असून, पावसाळ्यामध्ये शेतीमाल खरेदी विक्रीचे व्यवहार सुरळीत राहावे याकरिता प्रोफ्लेक्सचे डोम तयार करण्याचे कामास सुरुवात केलेली आहे.

उत्पन्न वाढीच्या दृष्टीने व शेतकऱ्यांच्या, येणाऱ्या वाहनांच्या सोयीचे दृष्टीने पेट्रोल पंप सुरू केलेला आहे. तर एनजीओच्या मदतीने बाजार आवारात गांडूळ व सेंद्रिय खत निर्मिती व विक्री सुरू केलेली आहे.

शेतकरी अडते यांच्यासाठी विविध सुविधा

शेतकरी, अडते व्यापारी यांच्याकरिता विविध सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस समितीचा नावलौकिक होताना दिसत आहे. गत अनेक वर्षांपासून बाजार समितीचे कामकाज पाहताना शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम केलेले आहे. या पुढेही अशाच सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे सभापती रूपचंद कडू यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT