Boycott of voting Agrowon
ॲग्रो विशेष

Boycott of voting : फक्त महाराष्ट्रच नाही तर युपीच्या दोन गावांनी टाकला मतदानावर बहिष्कार

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यासह देशातील ४९ जागांच्या लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २०) पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. महाराष्ट्रातील १३ जागांसाठी मतदान होत असून नाशिकमध्ये मात्र एका गावाने पाण्याच्या प्रश्नावरून मतदानावर बहिष्कार टाकला आहे. तर येथीलच चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू गावातील तरुणांनी गळ्यात कांदा आणि टोमॅटोच्या माळा घालून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला आहे. यादरम्यान उत्तर प्रदेश राज्यातील सिरथू विधानसभा मतदारसंघातील धरमपूर आणि हिसमपूर माधो गावातील लोकांनी रस्ता आणि गावातील इतर समस्यांमुळे मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

मेहुणे ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

राज्यातील मालेगावच्या मेहुणे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकताना सरकारचा निषेध नोंदवला आहे. या गावातील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत गावच्या पाण्याचा प्रश्न न सुटल्याने मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सरकारविरोधात निषेध नोंदवताना संपूर्ण गावकऱ्यांनी तिन्ही मतदार केद्रांकडे पाठ फिरवली आहे. यामुळे मतदान केंद्रावर शुकशूकाट पसरला होता.

प्रशासनाकडून मध्यस्थी

मेहुणे दिंडोरी मतदार संघातील या मतदान केंद्रावर मतदान व्हावे यासाठी प्रशासनाकडून मध्यस्थी केली जात आहे. तसेच मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राहुल खताळ यांनी देखील ग्रामस्थांची भेट घेत यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थ आपल्या मतावर ठाम असून येथे एकही मतदान झालेले नाही.

धरमपूर आणि हिसमपूर माधो गावात बहिष्काराचे पोस्टर

दरम्यान यूपीमधील सिरथू विधानसभा मतदारसंघातील धरमपूर आणि हिसमपूर माधो गावातील लोकांनी रस्ता आणि गावातील इतर समस्यांमुळे मतदानावर बहिष्कार टाकला आहे. यावेळी माधो गावातील हजारो ग्रामस्थांनी मतदान करण्यास नकार दिला आहे. तसेच याबाबत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्काराचे पोस्टर चौकाचौकात लावून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गावात विकासकामे झाली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून अनेक समस्या येथे आहेत. यामुळे विनंती करून देखील यावर कोणत्याच लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. यामुळे मतदानावरच बहिष्कार टाकल्याचे गावप्रमुख वीरेंद्र यादव यांनी सांगितले.

गावप्रमुख म्हणाले :

गावप्रमुख यादव म्हणाले, गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने लोकांना रेल्वे रूळ ओलांडावा लागतो. मुलांना देखील शाळेसाठी जीव मुठीत घेऊन रूळ ओलांडावा लागतो. याआधी येथे रेल्वेच्या धडकेने सुमारे डझनभर लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे रेल्वे रूळावर ओव्हर ब्रिज बांधावा, अशी जनतेची मागणी होती. यासाठी खासदारांनी आश्वासनही दिले होते. मात्र ते विसरले.

ग्रामस्थांचा ठाम निर्धार

यामुळे सध्या ग्रामस्थांमध्ये संपात असून ते मतदान केंद्राबाहेर उभे राहून उघड उघड बहिष्कार करत आहेत. यावरून येथे देखील ग्रामस्थांची समजूत काढण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहेत. येथे सिरथूचे एसडीएम महेंद्र श्रीवास्तव, सीडीओ कौशांबी डॉ. रवी किशोर आणि निवडणूक आयोगाचे निरीक्षक आणि इतर अधिकारी पोहोचले आहेत. मात्र जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मतदान न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

नगर परिषद मतदान केंद्रावर देखील बहिष्कार

दरम्यान नगर परिषद भरवरी येथील मतदान केंद्र क्रमांक सात येथील ग्रामीण बहरिया येथील ग्रामस्थांनी देखील मूलभूत समस्यांचे कारणामुळे मतदानावर बहिष्कार टाकला. यावेळी वीज, पाणी, नाले, गटार, रस्ते आदी समस्यांवर तोडगा न निघाल्याने ग्रामस्थांनी सकाळपासूनच मतदानाकडे पाठ फिरवली. याचा परिणाम आता येथे दिसत आहे.

कांदा आणि टोमॅटोच्या माळा

तसेच महाराष्ट्रात देखील पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू असून दुपारी १ वाजेपर्यंत २७.७८ टक्के मतदान पार पडले आहे. यादरम्यान चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील शेतकऱ्यांनी कांद्याच्या आणि टोमॅटोच्या माळा गळ्यात घालून रोष व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने कांदा उत्पादकांच्या आशेवर माती फिरवत कांदा निर्यात बंदी घातली होती. तर आता लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान केंद्राने बंदी उठवली. यात्र यात देखील पाचर मारून शेतकऱ्यांची कोंडी केली. यावरून चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा आणि टोमॅटोच्या माळा गळ्यात घालून निषेध नोंदवला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT