Tiger  Agrowon
ॲग्रो विशेष

Tiger Clash : नागभीड वनपरिक्षेत्रात दोन वाघांची झुंज

Nagbhid Forest Range : नागभीड वनपरिक्षेत्रातील वासाडा मक्ता हा परिसर येतो. जंगलव्याप्त या भागात वाघ, बिबट्यासह अन्य वन्यप्राण्यांचा वावर असतो.

Team Agrowon

Chandrpur News : नागभीड वनपरिक्षेत्रातील वासाडा मक्ता या गावात दोन वाघांची झुंज झाली. या झुंजीत एक वाघ गंभीर जखमी झाला. झुंजीचा हा प्रकार काहींनी याची देही याची डोळा बघितला. दरम्यान, याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाने गंभीर जखमी झालेल्या वाघाचा शोध सुरू केला आहे.

नागभीड वनपरिक्षेत्रातील वासाडा मक्ता हा परिसर येतो. जंगलव्याप्त या भागात वाघ, बिबट्यासह अन्य वन्यप्राण्यांचा वावर असतो. दरम्यान, वासाडा मक्ता या भागात दोन वाघ आमने-सामने आले. वर्चस्वासाठी या दोन्ही वाघांची झुंज झाली. हा प्रकार नागभीड वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ७५६ परिसरात घडला.

सकाळी फिरायला जाणाऱ्या अनेकांनी वाघाची झुंज बघितली. दोन वाघांच्या झुंजीत एक वाघ गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेतच त्याने तेथून पलायन केले. त्यानंतर नागरिकांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली.

माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी, वनकर्मचारी घटनास्थळी आले. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर रक्ताचा सडा दिसून आला. कोणतीही जीवितहानी होऊ नये व जखमी वाघ तत्काळ मिळावा याकरिता वनविभागाने शोधमोहीम सुरू केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत जखमी वाघ मिळाला नाही.

‘जंगलात जाणे टाळा’

दोन वाघांच्या झुंजीत एक वाघ गंभीर जखमी झाला. वाघ जखमी असल्याने त्याच्या मागे किंवा जंगलात प्रवेश करू नये. या परिसरात कुणीही भटकू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. सध्या जखमी असलेल्या वाघाचा शोध घेणे सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT