Keeper-100 S. L.' and 'Super Dry and Gloss Deeping Oil' Agrowon
ॲग्रो विशेष

Bedana Production : बेदाणा निर्मितीसाठी ‘एलंटा ॲग्रो’ची दोन उत्पादने

Elanta Agro Pvt. Ltd : सांगली येथील ‘एलंटा ॲग्रो प्रा. लि.’ यांनी बेदाणा निर्मितीसाठी ‘कीपर-१०० एस. एल.’ आणि ‘सुपर ड्राय ॲण्ड ग्लॉस डीपिंग ऑइल’ ही उत्पादने विकसित केली असल्याची माहिती संचालक संजय वजरीणकर व संजीव कोल्हार यांनी दिली.

Team Agrowon

Sangli News : सांगली येथील ‘एलंटा ॲग्रो प्रा. लि.’ यांनी बेदाणा निर्मितीसाठी ‘कीपर-१०० एस. एल.’ आणि ‘सुपर ड्राय ॲण्ड ग्लॉस डीपिंग ऑइल’ ही उत्पादने विकसित केली असल्याची माहिती संचालक संजय वजरीणकर व संजीव कोल्हार यांनी दिली.

एलंटा ॲग्रो गेल्या दोन दशकांहून अधिक काळ शेतकऱ्यांच्या सेवेत असून, त्यांच्या ७५ हून अधिक उत्पादने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. आपल्या उत्पादनाविषयी माहिती देताना संजय वजरीणकर व संजीव कोल्हार म्हणाले, की अनियमित वातावरणामुळे बेदाणा निर्मितीमध्ये अडथळे येत आहेत.

दर्जेदार बेदाणा निर्मिती करताना कमीत कमी वेळेत अधिक चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार होण्यासाठी ‘सुपर ड्राय ॲण्ड ग्लॉस’ हे उत्पादन द्राक्षांवरील नैसर्गिक मेणचट आवरण हटवून मण्यातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग जलद करते.

परिणामी, द्राक्षे वेगाने वाळून कमीत कमी वेळात चांगला बेदाणा तयार होतो. बेदाणा निर्मितीमध्ये वातावरणातील आर्द्रता वाढल्यास सूक्ष्म जिवाणू, बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तो टाळण्यासाठी ‘कीपर-१०० एस.एल.’ हे उत्पादन द्राक्षांवर संरक्षक कवच तयार करते. या दोन्ही उत्पादनांच्या वापरामुळे बेदाण्याची नैसर्गिक चव, रंग व दर्जा टिकवून ठेवण्यास मदत होते, असा दावा त्यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT