Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season : यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवरील पीक संरक्षित

Crop Insurance : १५ डिसेंबरपर्यंत एक लाख ३२ हजार ४४६ शेतकऱ्यांनी दोन लाख सहा हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित केले आहे.

Team Agrowon

Yavatmal News : रब्बी हंगामातही शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा काढला आहे. एक रुपयात विमा असल्याने मागील वर्षाच्या तुलनेत यंदा रेकॉर्ड ब्रेक नोंदणी झाली आहे. १५ डिसेंबरपर्यंत एक लाख ३२ हजार ४४६ शेतकऱ्यांनी दोन लाख सहा हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित केले आहे.

पेरणीपासून पीक काढणीपर्यंत गारपीट, अतिवृष्टी, अवकाळी, पावसाचा खंड, पूर अशा नैसर्गिक संकटात पिकांची हानी होती. त्यांचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. शेतकऱ्यांचे पीक संरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान पीकविमा योजना राबविली जाते.

शासनाने केवळ एक रुपयात पीकविमा काढून देण्याची सोय करून दिली आहे. त्यामुळे खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातही शेतकऱ्यांनी विमा भरण्यास पसंती दिली. १५ डिसेंबरपर्यंत एक लाख ३२ हजार ४४६ शेतकऱ्यांनी पीकविमा भरल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे.

पेरणी झाली नसेल तरी शेतकऱ्यांनी विमा भरावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते. पीकविम्यासाठी एक रुपयाच भरावा लागत असल्याने सर्व शेतकऱ्यांनी पीकविमा भरून घेतला.

दोन लाख हेक्टरवर पेरा

जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र अडीच लाख हेक्टर इतके आहे. यंदा रब्बी हंगामातील पेरणी उशिरा झाली. २० डिसेंबरपर्यंत एक लाख ७३ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक पेरा गव्हाचा आहे. अजूनही गव्हाचा पेरा सुरू असून, काही दिवस पेरणी होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT