Farmer Death Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Death : यवतमाळ जिल्ह्यात नऊ महिन्यांत दोनशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Yavatamal Farmer Death News : शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून एक ना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीत.

Team Agrowon

Yavatmal News : शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून एक ना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. जिल्ह्यात मागील नऊ महिन्यांत तब्बल २०५ शेतकरी आत्महत्यांची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. त्यापैकी ४५ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची प्रकरणे चौकशीत आहेत.

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने नदी-नाल्यांच्या काठावरील शेतजमीन पूर्णपणे खरडून गेली. प्रशासनाने जाहीर केलेल्या पैसेवारीतून शेतकऱ्यांची पार निराशाच झाली आहे. सोयाबीन व कापूस पिकांच्या उत्पन्नात घट होण्याची चिन्हे असताना प्रशासनाच्या लेखी पीक परिस्थिती उत्तम आहे.

त्यामुळे ही एक प्रकारची थट्टाच असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. शेतकरी कितीही उमेदीने शेतात राबत असला तरी, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ ठरलाच आहे. यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे या खरीप हंगामात आर्थिक संकट अधिकच गडद होण्याची चिन्हे आहेत.

गेल्या नऊ महिन्यांत २०५ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. त्यापैकी १०५ शेतकरी आत्महत्या मदतीस पात्र ठरल्या असून, ५५ प्रकरणे अपात्र ठरली. तर, ४५ प्रकरणे चौकशीत आहेत. २००१ ते २०२३ या २३ वर्षांत एकूण पाच हजार ६०३ आत्महत्या झाल्या. त्यापैकी दोन हजार ३३१ शेतकरी आत्महत्या मदतीस पात्र ठरल्या.

तब्बल तीन हजार २२७ आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. शेतकरी आत्महत्येचे सत्र जिल्ह्यात अजूनही सुरूच आहे. रोज कुठे ना कुठे शेतकरी आत्महत्या होत आहेत. २००७ ते २०२२ या कालावधीत वर्षाला सरासरी ३०० शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. दरवर्षी वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

महिना आत्महत्या

जानेवारी २६

फेब्रुवारी १३

मार्च २४

एप्रिल १३

मे २०

जून ३२

जुलै २०

ऑगस्ट ३९

सप्टेंबर १८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT