cotton crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Bogus fertilizer : खतामुळे दोनशे एकरांतील पीक उद्ध्वस्त

kharif season : गुजरातमधील एका कंपनीच्या खतामुळे नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यामधील २०० एकरांतील कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले.

Team Agrowon

Nagpur News : गुजरातमधील एका कंपनीच्या खतामुळे २८ शेतकऱ्यांचे २०० एकरांतील कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. परिणामी, भरपाई आणि कृषी केंद्र संचालकार कारवाई न केल्यास आंदोलन करू, असा इशारा कुही तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

कृषिमंत्री धनंजय मुंडे हे सोमवारी (ता.२) नागपूर दौऱ्यावर होते. या वेळी शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेत हा इशारा दिला. शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, गुजरातेतील एका  कंपनीचे खत त्यांनी कपाशी, धान, मिरची या पिकांकरिता वापरले. मात्र काही दिवसांत या खताचा विपरीत परिणाम पिकावर दिसून आला. या खताच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामध्ये कुही तालुक्‍यातील वरीखंडी, ससेगाव, टाकळी, मांगली येथील २८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. २०० एकरांतील पिकांना याचा फटका बसला असून, त्यापोटी भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

विशेष म्हणजे २१ जुले २०२३ रोजी या खतावर विक्री बंदीचा आदेश लादण्यात आला. त्यानंतरही वग गावातील वैद्य कृषी केंद्राच्या संचालकांनी शेतकऱ्यांना या खताची विक्री केली, असा आरोपही शेतकरी करीत आहेत. त्याकरीता ई-पॉस मशिनचा साठा निरंक दाखविण्यात आला. ई-पॉस मशिनमध्येही याकरिता छेडछाड करण्यात आली. हाच कृषी केंद्र संचालक युरियाची जादा दराने विक्री करीत असल्याचा पुरावाही या वेळी कृषिमंत्र्यांना सादर करण्यात आला. विहित नमुन्यात बिल न देता केंद्र संचालक इस्टिमेट बिल देत असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे होते. परवान्यात खताचा समावेश नसताना विक्री करण्यात आली. शिवाय गोदाम अवैध असल्याचाही आरोप शेतकऱ्यांचा होता. अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या कृषी केंद्र संचालकावर गुन्हा दाखल करा, कपाशीसह इतर पिकांच्या नुकसानीपोटी भरपाई द्या व संबंधित कृषी केंद्राची मान्यता कायमची रद्द करा, असे कृषिमंत्र्यांकडे साकडे घातले.

नुकसान भरपाई आणि कृषी केंद्र संचालकावर कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.  त्यामध्ये स्वप्नील राऊत, संजय निरगुळकर, धनपाल लोहारे, गणेश देशमुख, रेणुका पडोळे, सुनील खवास, दादाराव हिरेखन, परमानंद लोखंडे, नारायण डहारे, परमेश्‍वर पडोळे, केजराज पडोळे, रंजित सुखदेवे यांचा समावेश होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT