Rose Flower Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Rose Flower Exhibition : अकोल्यात दोन दिवस गुलाब फुलांचे प्रदर्शन

अकोल्यात ४९ वर्षांपासून पुष्प प्रदर्शनाचे आयोजन गार्डन क्लबच्या वतीने केले जाते.

Team Agrowon

अकोला ः शहरातील पर्यावरण प्रेमींनी (Environment Lovers) टेरेस, बाल्कनी, अंगणात फुलेवल्या बागांमधील गुलाब पुष्पांचा (Rose Flower) सुगंध अकोल्यातील खंडेलवाल भवनमध्ये शनिवार (ता. ७) आणि रविवार (ता. ८) दरवळणार आहे. शहरातील गार्डन क्लबद्वारे या पुष्प प्रदर्शनाचे (Flower Exhibition) आयोजन करण्यात आले आहे.

अकोल्यात ४९ वर्षांपासून पुष्प प्रदर्शनाचे आयोजन गार्डन क्लबच्या वतीने केले जाते. यंदा खंडेलवाल भवनात वार्षिक पुष्प प्रदर्शन व पुष्प स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती गार्डन क्लबचे अध्यक्ष अजय सेंगर यांनी दिली. मंगळवारी (ता. तीन) माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली.

या वेळी क्लबचे सचिव विजय जानी, माजी अध्यक्ष विजय ढवळे, उपाध्यक्ष जयप्रकाश पाटील, सहसचिव शरद कोकाटे, सहसचिव संजय शर्मा, कोशाध्यक्ष सुनील कविश्‍वर, सदस्य सुधीर राठी, दिनेश पारेख, अर्चना सापधारे, वैशाली पाटील, चंदना जैन उपस्थित होते.

हे वार्षिक पुष्प प्रदर्शन दोन वर्षे कोरोना संकटामुळे होऊ शकले नव्हते. यंदा नव्या जोमाने हे पुष्प प्रदर्शन व स्पर्धा होत आहे. यामध्ये विविध प्रकारच्या ५२ श्रेणी ठेवण्यात आल्या असून, प्रत्येक श्रेणीत प्रथम, द्वितीय व तृतीय असे मिळून १५६ पारितोषिके दिली जाणार आहेत.

सहा धावत्या ट्रॉफी दिल्या जातील. यात चॅम्पियन ट्रॉफी, रनर ट्रॉफी, किंग ऑफ रोज, क्वीन ऑफ रोज, प्रिन्स ऑफ रोज व प्रिन्सेस ऑफ रोज, अशा ट्रॉफी राहणार आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी ६ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

Solapur DCC Bank: ‘डीसीसी’ने ओलांडला दहा हजार कोटींचा टप्पा

Onion Harvesting: कांदा वाचवण्यासाठी शेतशिवारात लगबग

Dharashiv Agriculture Loss: ऐन सुगीत ‘पूर्वमोसमी’चे धुमशान

SCROLL FOR NEXT